आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीत इमारतीला भीषण आग:27 जणांचा होरपळून मृत्यू, इमारतीच्या खिडक्या तोडून अनेकांना बाहेर काढले, 30-35 जण अजूनही अडकलेले

7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्लीच्या मुंडवा मेट्रो स्थानकाजवळ शुक्रवारी सायंकाळी चार मजली व्यावसायिक इमारतीला भीषण आग लागली. आगीच्या तडाख्यात सापडून २७ लोकांचा मृत्यू झाला. गंभीर भाजलेल्या १२ जणांना रुग्णालयात दाखल केले. अग्निशमन दल आणि पोलिसांनी ५० हून अधिक नागरिकांना वाचवले. या इमारतीत अनेक कंपन्यांची गोदामे आहेत. येथे सीसीटीव्ही कॅमेरे, राउटर, वायफाय आदींची निर्मिती-जोडणीची कामे केली जातात.

इमारतीत जाण्या-येण्यासाठी एकच दरवाजा आहे. आग दरवाजाजवळच लागली. त्यामुळे अडकलेल्या लोकांना बाहेर पडता आले नाही. काहींनी खिडक्यांतून उड्या मारल्या. घटनेबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.

मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती...
पहिल्या मजल्यावरील सीसीटीव्ही कॅमेरा व राउटर तयार करणाऱ्या कंपनीतून आग सुरू झाली. रात्री उशिरापर्यंत अनेक बेपत्ता होते. त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे. पहिल्या मजल्यांवर २७ मृतदेह आढळले. तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर १० ते १५ जण अडकले असल्याची भीती व्यक्त आहे.

आतापर्यंत 150 जणांची सुटका
30-40 लोक अजूनही इमारतीत असल्याची माहिती आहे. आतापर्यंत 150 जणांची सुटका करण्यात आली आहे. जखमींना संजय गांधी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मदत आणि बचाव कार्यासाठी 100 कर्मचाऱ्यांना घटनास्थळी तैनात करण्यात आले आहे.

दुर्घटनेत 16 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. त्यांचे मृतदेह बाहेर काढताना अग्निशमन दलाचे कर्मचारी.
दुर्घटनेत 16 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. त्यांचे मृतदेह बाहेर काढताना अग्निशमन दलाचे कर्मचारी.

एका व्यक्ती ताब्यात
दुर्घटनेबाबत दिल्ली पोलिसांनी सांगितले की, मेट्रो स्टेशनच्या पिलर 544 जवळ बांधलेली ही 3 मजली व्यावसायिक इमारत आहे. या इमारतीत अनेक कंपन्यांना भाड्याने जागा देण्यात आली आहे. पहिल्या मजल्यावर सीसीटीव्ही कॅमेरा आणि राउटर बनवणारी कंपनी आहे. पहिल्या मजल्यावरूनच प्रथम आग भडकली व नंतर पुर्ण इमारतीमध्ये ती पसरली. त्यामुळे पोलिसांनी दुर्घटनेच्या तपासासाठी कंपनीच्या मालकाला ताब्यात घेतले आहे.

बातम्या आणखी आहेत...