आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेलंगाणातील पॉवर प्लँटमध्ये भीषण आग:रेस्क्यू टीममधील 6 जणांचा मृत्यू, 3 जण बेपत्ता; आतापर्यंत 10 जणांना वाचवण्यात यश

हैदराबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कृष्णा नदीनर बनलेला श्रीसैलम डॅम तेलंगाणा आणि आंध्र प्रदेशाच्या सीमेवर आहे

तेलंगाणातील श्रीसैलमच्या टीएस जेंको पॉवर प्लँटमध्ये गुरुवारी रात्री लागलेल्या आगीत 6 जणांचा मृत्यू झाला आहे, तसेच, तीन जण बेपत्ता झाले, त्यांचा शोध अद्याप सुरू आहे. रेस्क्यू टीमने शुक्रवारी सकाळी सांगितले की, 10 जणांना वाचवण्यात यश आले आहे. आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती आहे.

मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी सांगितले की, आम्ही घटनेचे अपडेट घेत आहोत. मंत्री जगदीश्वर रेड्डी आणि ट्रांसको-जेंको कंपनीचे सीएमडी डी प्रभाकर राव यांच्याशी चर्चा झाली आहे. सध्या दोघेही घटनास्थळावर आहेत.

तेलंगाणाचे मंत्री जी जगदीश्वर रेड्डी यांनी सांगितले की, दुर्घटना गुरुवारी रात्री 10.30 वाजता घडली. 10 जणांना बाहेर काढण्यात आले आहे. पॉवर सप्लायदेखील बंद करण्यात आला आहे. आम्ही सिंगारेनी कोल माइंसकडून मदत घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आत अडकलेल्या लोकांना बाहेर काढणे आमची प्राथमिकता आहे.

बातम्या आणखी आहेत...