आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आग अर्ध्या तासात नियंत्रणात:दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयाला आग, मुख्यालयातील अनेक कादगपत्रे जळून खाक

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्लीतील अखिल भारतीय काँग्रेसच्या मुख्यालयाला आज सायंकाळी आग लागली होती. अचानक आग लागल्याने इमारतीमध्ये धुराचे लोट दिसत होते. यानंतर अग्निशामन दलाचे काही बंब घटनास्थळी दाखल झाले होते. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांचे शर्थीचे प्रयत्न केले. ही आग अर्ध्या तासात नियंत्रणात आणण्यात अग्निशामन दलाला यश आले आहे. मात्र पक्ष मुख्यालयातील अनेक कादगपत्रे यावेळी जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे.

नेमकी काय घडली घटना?
दिल्लीच्या काँग्रेस मुख्यालयातील एसीच्या वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट झाल्यामुळे सायंकाळी सातच्या सुमारास आग लागली होती. मुख्यालयात असलेल्या महिला काँग्रेसच्या कार्यालयातून सायंकाळी अचानक धूर निघत असल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर अग्निशामन दल आणि पोलिसांनी तत्काळ आगीची माहिती दिली.

दिल्लीत बसही जळून खाक
दिल्लीतील कनॉट प्लेस येथील केंद्रावरून आलेल्या अग्निशामन दलाच्या पथकाने तातडीने कारवाई करून आग नियंत्रणात आणली आहे. दिल्लीतील महिपालपूर भागात आज बस जळाल्याचा हृदयद्रावक व्हिडिओ समोर आला आहे. डीटीसीची एसी बस मार्ग क्रमांक 534 वर धावत होती, यावेळी याबसला आग लागल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली आहे. घटनास्थळी दोन्ही बाजूचे रस्ते सील करून आगीवर नियंत्रण मिळवण्यात येत आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही

बातम्या आणखी आहेत...