आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Fire In ICU Ward Of Cordiology Hospital; 7 Vehicles On The Spot, Efforts Continue To Evacuate Patients

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

यूपीमधील हॉस्पीटलमध्ये आग:कानपुरच्या कॉर्डिओलॉजी हॉस्पिटलमधील आगीमध्ये दोन रुग्णांचा मृत्यू; यामधून 147 लोकांची सुटका करण्यात आली

कानपुरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संबंधित प्रकरणाचा अवहाल मागितला असून यासाठी मोठी कमिटी नियुक्त करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले आहेत

उत्तरप्रदेशातील कानपुर येथील कॉर्डिओलॉजी हॉस्पिटलच्या जनरल वार्डमध्ये रविवार सकाळी आग लागली होती. या आगीमध्ये दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत रूग्णांमध्ये घाटमपूर नौरंगा येथील रहिवासी 80 वर्षांची रसूलन बीबी आणि हमीरपूर रथ येथील टेकचंद्र यांचा समावेश आहे. तर इतर 147 लोकांना हॉस्पिटलमधील खिडक्याच्या काचा तोडून बाहेर काढण्यात आले आहे. या घटनेचे माहिती मिळताच आरोग्य कर्मचारी आणि अग्निशामक दल वेळेवर घटनास्थळी दाखल झाले आहे. एसीपी महेंद्र सिंह यानी दिलेल्या माहितीनुसार, हॉस्पिटलमधील आयसीयुमध्ये 9 आणि जनरल वार्डमध्ये 147 उपचार घेत होते. सोबतच लाग कशी लागली याचा तपासदेखील स्थानिक प्रशासनकडून सुरु आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संबंधित प्रकरणाचा अवहाल मागितला असून यासाठी मोठी कमिटी नियुक्त करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले आहेत. मिळलेल्या माहितीनुसार, ही आग एका स्टोरमध्ये शॉट सर्किटमुळे लागली असल्याचे प्राथमिक अवहालात स्पष्ट झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...