आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
गुजरातच्या राजकोट जिल्ह्यातील एका कोव्हीड हॉस्पिटलमध्ये गुरुवारी मध्यरात्रीनंतर आग लागली. या घटनेत पाच कोरोना रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला तर एका रुग्णाची प्रकृती चिंताजनक आहे. मशीनमध्ये शॉर्टसर्किट झाल्यामुळे आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी आगीच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
शहरातील आनंद बंगला चौकाजवळ उदय शिवानंद कोव्हीड हॉस्पिटलमधील आयसीयू वार्ड गुरुवारी रात्री एक ते दोन दरम्यान आग लागली. हॉस्पिटलमध्ये 33 कोरोना रुग्णांवर उपचार सुरु होते. सुखरूप रुग्णांना दुसऱ्या कोव्हीड सेंटरमध्ये हलवण्यात आले आहे.
मृत रुग्णांची नावे - रामसिंहभाई, नितिनभाई बदानी, रसिकलाल अग्रावत, संजय राठोड आणि केशुभाई अकबरी आहेत. उदय शिवानंद हॉस्पिटलला सप्टेंबर महिन्यात कोव्हीड सेंटरची परवानगी मिळाली होती. गुजरातमध्ये ऑगस्टपासून आतापर्यंत हॉस्पिटलला आग लागण्याची ही चौथी घटना आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.