आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Tragedy Victims In Delhi Fire: 'My Sister Is Alive Or Dead In Fire, At Least Tell Me', Relatives Lament

दिल्लीतील आगीतील पीडितांची व्यथा:'माझी बहीण जिवंत आहे की आगीत मेली, निदान हे तरी सांगा', नातेवाईंकांचा आक्रोश

12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्माईल खानची बहीण मुस्कान ही दिल्लीच्या मुंडका येथील त्याच इमारतीत अकाउंटंट होती, जिथे शुक्रवारी संध्याकाळी लागलेल्या आगीत 27 लोकांचा मृत्यू झाला. त्याची बहीण जिवंत आहे की आगीत मरण पावली आहे, हे इस्माईलला अजूनही कळू शकलेले नाही. आपल्या बहिणीच्या शोधात त्यांनी15 तास जवळपासच्या प्रत्येक हॉस्पिटलमध्ये जावून शोध घेण्याचा प्रयत्न केला.

इस्माईलने बहीण मुस्कानच्या शोधात जवळपासच्या प्रत्येक हॉस्पिटलमध्ये शोध घेतला, पण ती सापडली नाही.
इस्माईलने बहीण मुस्कानच्या शोधात जवळपासच्या प्रत्येक हॉस्पिटलमध्ये शोध घेतला, पण ती सापडली नाही.

सायंकाळी साडेचारच्या सुमारास त्यांना मुस्कानचा फोन आला, त्यात मुस्कान म्हणाली की, भीषण आग लागली आहे, या आणि मला वाचवा. इस्माईल पंधरा मिनिटांत घटनास्थळी दाखल झाला. इस्माईलने इमारतीत चढण्याचा प्रयत्न केला, मात्र तिथे लावण्यात आलेल्या काचेमुळे त्याला इजा झाली, त्याच्या हातातून रक्त वाहू लागले, पण त्याला आतमध्ये जाता आले नाही.

इमारतीत अडकलेल्या लोकांना क्रेनच्या साह्याने बाहेर काढत असल्याचे इस्माईलने पाहिले, इस्माईलला आशा होती की त्याची बहीण देखील बाहेर येईल, परंतु इमारतीतून जे कोणी सुखरुपपणे बाहेर आले त्यात त्याची बहिण मुस्कान नव्हती.इस्माईल रात्रभर संजय गांधी मेमोरियल हॉस्पिटल, सफदरजंग हॉस्पिटल, राम मनोहर लोहिया हॉस्पिटलमध्ये फेऱ्या मारत राहिला.अद्यापही त्यांचा शोध सुरुच आहे.

आपल्या प्रियजनांच्या शोधात लोकांची सैरावैरा धाव

मुंडका येथील याच इमारतीला शुक्रवारी संध्याकाळी भीषण आग लागली, त्यात 27 जणांचा मृत्यू झाला.
मुंडका येथील याच इमारतीला शुक्रवारी संध्याकाळी भीषण आग लागली, त्यात 27 जणांचा मृत्यू झाला.

13 मे रोजी बाहेरील दिल्लीतील मुंडका येथे एका चार मजली इमारतीला लागलेल्या भीषण आगीत 27 जणांचा मृत्यू झाला होता. आतापर्यंत या 27 जणांची नावे अद्यापही जाहीर करण्यात आलेली नाहीत. या इमारतीत काम करणाऱ्यांचे नातेवाईक अपघातस्थळी व रुग्णालयाबाहेर भटकत आहेत.

जवळपास 10 ते 12 कुटुंबियांना त्यांची बहीण, वहिनी, भाची, मेव्हणी अजूनही कुठे आहेत,ते जिवंत आहेत किंवा मृत याचा पत्ता लागलेला नाही.. या इमारतीत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची निर्मिती करण्याचा कारखानापण सुरु होता, त्यात प्रामुख्याने महिलावर्ग मोठ्या प्रमाणात काम करत होत्या. या आगीत सर्वाधिक बळी महिलांची असण्याची शक्यता आहे.

'प्रेयसीचा व्हिडिओ कॉल आला, पण मी काहीच करु शकलो नाही'

इस्माईलप्रमाणेच संजय गांधी मेमोरियल हॉस्पिटलच्या बाहेर एक 20 वर्षांचा मुलगा सापडला. तो हताशपणे आपल्या मैत्रिणीला शोधत होता. ज्या इमारतीला आग लागली त्याच इमारतीत तीही काम करत होती. त्याने सांगितले की, 'संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास मला माझ्या मैत्रिणीचा व्हिडिओ कॉल आला. ती ओरडत होती, इथे आग लागली आहे, मला वाचवा. तिला धीर देण्याशिवाय मी काहीच करू शकत नव्हतो. फोन कट झाल्यावर मी लगेच घटनास्थळी पोहोचलो, पण तेव्हापासून मला माझ्या मैत्रिणीबद्दल काहीही समजले नाही.

'जशोदा देवी 5-6 हजार रुपये कमवत होत्या, आग लागल्यानंतर त्या बेपत्ता'

रिंकूने तिची भाची जसोदाचा 5 रुग्णालयांमध्ये शोध घेतला, मात्र तिचा अद्याप काही शोध लागलेला नाही.
रिंकूने तिची भाची जसोदाचा 5 रुग्णालयांमध्ये शोध घेतला, मात्र तिचा अद्याप काही शोध लागलेला नाही.

रिंकू कुमारची 35 वर्षीय भाची, मूळची बिहार, जसोदा देवी हिचा आगीच्या घटनेला 8 तास उलटूनही शोध लागलेला नाही. रिंकूने 3-4 रुग्णालयांना भेटी दिल्या आहेत आणि पोलिसांनाही विचारले आहे, पण कोणीही काही सांगत नाही.

संध्याकाळी 5 च्या सुमारास, रिंकूला कळले की तिची भाची ज्या इमारतीत काम करते त्याच इमारतीत कॅमेरे लागले होते. रिंकू आता घटनास्थळासमोर तिच्या भाचीचा फोटो हातात घेऊन उभी आहे, जेणेकरून तिची भाची कुठे आहे हे कोणी सांगू शकेल. रिंकू सांगतात की, जसोदा देवी या सीसीटीव्ही कॅमेरे बनवण्याच्या या कारखान्यात गेल्या 3 वर्षांपासून काम करत होत्या आणि त्यांना सुमारे 5 ते 6 हजार रुपये पगार मिळत होता.

ज्यांचे कुटुंबीय आगीच्या 4 मजली इमारतीत काम करत होते, त्यांनी प्रथम घटनास्थळ गाठले, त्यांच्या नातेवाईकांचा घटनास्थळी पत्ता न लागल्याने कुटुंबीयांनी रुग्णालयाच्या फेऱ्या मारण्यास सुरुवात केली. घटनास्थळी भेट दिल्यानंतर आम्ही संजय गांधी मेमोरियल हॉस्पिटलमध्येही पोहोचलो.

'आधी मला सांगा माझी बहीण कुठे आहे, कोणीच उत्तर नाही देत’

मुन्नी रात्रभर तिची मेहुणी भारतीच्या शोधात घटनास्थळावरून हॉस्पिटलच्या फेऱ्या मारत राहिली.
मुन्नी रात्रभर तिची मेहुणी भारतीच्या शोधात घटनास्थळावरून हॉस्पिटलच्या फेऱ्या मारत राहिली.

हॉस्पिटलच्या बाहेरच्या बाकावर बसलेल्या मुन्नीचे डोळे ओले झाले होते. ज्या इमारतीत आग लागली त्याच इमारतीत मुन्नीची 45 वर्षीय वहिनी भारती काम करत होती. आतापर्यंत भारतीबद्दल काहीही माहिती नाही. भारतीचा भाऊ गौरव निराश झाला आहे आणि वेगवेगळ्या लोकांना त्याच्या बहिनीची माहित विचारत असताना त्याचा गळा दाटून आला होता. चिडून तो म्हणतो, 'तू माझ्या बहिणीची माहिती नंतर घे, आधी ती कुठे आहे ते सांग. ना हॉस्पीटल मधील काही सांगत आहेत, ना पोलीस काही सांगत आहे.

संजय गांधी हॉस्पिटलच्या बाहेर सलमान अन्सारी आपल्या 35 वर्षीय मावशी मुसरतचा फोटो घेऊन लोकांना विचारत आहे, ‘त्यांच्याबद्दल काही कळलं का?’ मुसरत या दीड वर्षांपासून त्याच इमारतीत मदतनीस म्हणून काम करत होत्या. सलमानचे म्हणणे आहे की, त्याला पाच वाजण्याच्या सुमारास इमारतीमध्ये आग लागल्याचे समजले, परंतु अद्यापपर्यंत सलमानच्या मावशीचा काही पत्ता लागला नाही.

अपघातात बळी पडणाऱ्यांमध्ये महिलांचीच संख्या सर्वाधिक

मुंडक्याला ज्या इमारतीत आग लागली त्या इमारतीत बहुतांश महिला कर्मचाऱ्यांनी काम करत असून आगीत सर्वाधिक बळी महिलांचेच गेले आहेत. संध्याकाळी उशिरा आम्ही घटनास्थळी पोहोचलो तेव्हा स्थानिक लोकांनी सांगितले की या इमारतीत बहुतांश महिला काम करतात. घटनास्थळी अनेक महिलांच्या चपलाही विखुरलेल्या आहेत, यावरून हे सिद्ध होते की बहुतांश महिला येथे कामावर होत्या.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या इमारतीत 80-100 लोक करत होते काम

दिल्ली पोलिसांचे पश्चिम विभागाचे अतिरिक्त सीपी समीर शर्मा यांनी दिव्य मराठीला सांगितले की, “या प्रकरणात आतापर्यंत दोन जणांना अटक करण्यात आली आहे. इमारतीच्या मालकाचा शोध सुरू आहे. आम्ही बिल्डिंग ऑपरेटर्सना कागदपत्राची प्रत मागितली, आम्हाला कळले की या इमारतीत 80-100 लोक काम करतात. आमचा तपास सुरु असून लवकरच आम्ही आणखी लोकांना अटक करु.

बातम्या आणखी आहेत...