आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Fire On Delhi Dehradun Shatabdi Express; The Blazing Coach Was Separated From The Train, The Bogie Was Empty In Haridwar, So No Casualties

उत्तराखंडमध्ये द बर्निंग ट्रेन:दिल्ली-देहरादून शताब्दी एक्सप्रेसमध्ये लागली आग; हरिद्वारमध्ये डबा रिकामा झाल्याने वाचले प्रवाशांचे प्राण

देहरादूनएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दुपारी 12 वाजेनंतर राईवाला आणि कंसारो रेल्वेस्टेशन जवळ घडली.

दिल्ली येथून देहरादूनला जाणाऱ्या शताब्दी एक्सप्रेसमध्ये शनिवारी सकाळी आग लागली. सुदैवाने या घटनेत कुणालाही हानी झाल्याचे वृत्त नाही. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगितले जात आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनुसार ही दुर्घटना उत्तराखंडचे DGP अशोक कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार दुर्घटनेत कोणत्याही प्रवाशाला इजा झालेली नाही. 02017 अप शताब्दी एक्सप्रेसमध्ये हरिद्वारच्या जवळ कंसरो स्टेशनजवळ ही आग लागली. थोड्याच वेळात बोगीने पूर्णपणे पेट घेतला. बोगीच्या खिडक्यांमधून आगीचे लोळ बाहेर येऊ लागले.

डबा ट्रेनपासून वेगळे केले
ट्रेनमध्ये आग लागल्याची सूचना मिळताच रेल्वे अधिकाऱ्यांनी फायर ब्रिगेडला बोलावले. रेल्वेनुसार दुर्घटनेनंतर ज्या डब्यामध्ये आग लागली होती. तो कापून ट्रेनपासून वेगळा करण्यात आला आणि ट्रेन पुढच्या प्रवासाला रवाना करण्यात आली.

कोच सी-5 पूर्णपणे जळून खाक
या दुर्घटनेत शताब्दी ट्रेनचा कोच सी-5 पूर्णपणे जळून खाक झाला आहे. या कोचमध्ये कोणताही प्रवासी नव्हता. रेल्वेच्या सूत्रांनुसार, ट्रेनचा हा डबा हरिद्वारमध्ये रिकामा होतो. यामुळे या कोचमध्ये कोणताही प्रवासी असल्याची शक्यता नाही.

बातम्या आणखी आहेत...