आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Armistice Violation By Pak | Fired At BSF Personnel Who Were Fencing The Border | Marathi News

पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन:सीमेवर कुंपण घालणाऱ्या BSF जवानांवर केला गोळीबार

जम्मू/काश्मीर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानने पुन्हा एकदा सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. सीमेवर कुंपण घालणाऱ्या बीएसएफच्या जवानांवर पाकिस्तानी सैनिकांनी गोळीबार केला. मात्र, नंतर भारतीय जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले.

बीएसएफनुसार, पाकिस्तानी लष्कराने अरनिया सेक्टरमध्ये बीएसएफच्या पेट्रोलिंग पार्टीवर गोळीबार केला. मात्र, यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. यानंतर भारतीय सुरक्षा दलांनीही चोख प्रत्युत्तर दिले.

पाकिस्तानी रेंजर्स कुंपण घालण्यास विरोध करत होते
बीएसएफने सांगितले की, पाकिस्तानच्या रेंजर्सनी भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर गोळीबार केला. भारताकडून सीमेवर कुंपण घालण्याच्या कामाला पाकिस्तानी रेंजर्स विरोध करत होते. यानंतर त्यांनी बीएसएफ जवानांवर गोळीबार केला. मात्र, यामध्ये कोणीही जखमी झाले नाही.

आठवडाभरापूर्वी एका घुसखोराला पकडण्यात आले होते
27 ऑगस्ट रोजी बीएसएफने एका पाकिस्तानी घुसखोराला सीमेवर अटक केली होती. अधिका-यांनी सांगितले की, बीएसएफ जवानांनी सियालकोटचा रहिवासी मोहम्मद शबद (45) याला घुसखोरी करताना पाहिले, तो सीमेपलीकडून अरनिया सेक्टरमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होता. इशारा देण्यासाठी त्यांनी गोळ्या झाडल्या, मात्र तो थांबला नाही आणि त्यानंतर त्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...