आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराओला स्कूटर बुक करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जर तुम्ही ओला स्कूटर बुक केली असेल आणि तिची डिलिव्हरी मिळण्यासाठी खूप दिवसांपासून वाट पाहत असाल, तर ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. ज्या लोकांनी S1, ओला S1 प्रो इलेक्ट्रिक स्कूटरची अडवान्स बुकिंग केली होती त्यांना 15 डिसेंबरपासून स्कूटरची डिलिव्हरी मिळू शकते.
ओलाचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी ट्विटरवर शेअर केले आहे की ओला इलेक्ट्रिक स्कूटर्सचे डिस्पॅच सुरू झाले आहे. कंपनी डायरेक्ट-टू-कस्टमर सेल मॉडेलचा वापर करत आहे, याचा अर्थ यामध्ये कोणताही डीलरशिप किंवा मीडिएटरचा समावेश नाही. यामुळेच ओला S1 आणि आणि S1 प्रो इलेक्ट्रिक स्कूटर्स थेट ग्राहकांच्या दारात पोहोचवल्या जातील.
ओला ई-स्कूटरची डिलिव्हरी 15 डिसेंबरपासून सुरू होणार आहे
ओला इलेक्ट्रिक स्कूटर दिलेल्या मुदतीनुसार स्कूटर वितरित करु शकली नव्हती. ओलाने 25 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबरपर्यंत ओला इलेक्ट्रिक टेस्ट राइड्स आणि डिलिव्हरी सुरू करण्याची अंतिम मुदत वाढवली होती. ओला इलेक्ट्रिक स्कूटर केवळ इनवाइटच्या आधारावर टेस्ट राइड 10 नोव्हेंबरपासून सुरू केली होती. अशा वेळी आता नवीन ओला ई स्कूटरची डिलीवरी उद्या म्हणजेच 15 डिसेंबरपासून सुरू होणार आहे.
पुढची परचेज विंडो जानेवारीपासून उघडणार
तर एका यूजरच्या परचेज विंडो कधी उघडणार या प्रश्नावर कंपनीने म्हटले की, ओला इलेक्ट्रिक स्कूटरची बुकिंग जानेवारीपासून सुरू होऊ शकते. जी भारतात 1000 सिटीमध्ये डिलीवर केली जाईल. ओला S1 आणि S1 प्रोची किंमत क्रमशः 99,999 आणि 129,999 रुपये आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.