आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना व्हायरस:जगभरात कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर तब्बल एका वर्षाने 'लक्षद्विप'मध्ये कोरोनाचा पहिला रूग्ण आढळला

नवी दिल्ली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जगात कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर तब्बल एका वर्षाने लक्षद्विपमध्ये शिरकाव झाला

संपूर्ण जगात कोरोनाचा झालेला उद्रेक आता हळूहळू कमी होताना दिसत आहे. यावर लस देखील आली आहे. अशातच भारतातील एका भागात अद्यापर्यंत कोरोनाचा शिरकाव झाला नव्हता. मात्र आता तिथेही कोरोनाचा पहिला रूग्ण आढळला आहे.

केरळच्या पश्चिमेला अरबी समुद्रात वसलेल्या 'लक्षद्विप' हा अद्याप कोरोनामुक्त होता. मात्र मंगळवारी येथे कोरोना पहिला रुग्ण आढळला. जगात कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर तब्बल एका वर्षाने कोरोनाचा लक्षद्विपमध्ये शिरकाव झाला. कोरोनाची लागण झालेली व्यक्ती मूळची लक्षद्विपची रहिवासी आहे, त्याने 3 जानेवारी रोजी कोची ते कवरत्ती असा प्रवास केला आहे. लक्षद्विप प्रशासनाने दोन आठवड्यांपूर्वीच कोरोनासंदर्भातील नियमांमध्ये बदल केले होते. कोचीवरुन येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाईनचे नियम घालून देण्यात आले होते. त्यानंतर ही बाब समोर आली आहे.

बातम्या आणखी आहेत...