आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोनाविरुद्धच्या युद्धात उतरलेल्या भारताच्या किशाेरवयीन मुलांनी म्हणजेच टीन इंडियाने दमदार सुरुवात केली आहे. देशात सोमवारी १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू झाले. पहिल्याच दिवशी ४१ लाख मुलांनी लस घेतली. मध्य प्रदेशात सर्वाधिक ७.५ लाख मुलांना डोस मिळाला. देशात एकाच दिवसात ४१ लाख मुलांना लस मिळणे यासाठी महत्त्वाचे आहे की, या वयोगटात देशात फक्त ७.४ कोटी मुले आहेत. म्हणजे रोज याच वेगाने लसीकरण झाले तर केवळ १८ दिवसांत या वयाेगटातील सर्व मुलांचा पहिला डोस पूर्ण होऊ शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, पहिल्याच दिवशी मुलांच्या लसीकरणासाठी त्यांचे पालक अभिनंदनास पात्र आहेत. राज्यांत किशोरांच्या संख्येच्या हिशेबाने पाहिल्यास हिमाचल प्रदेशात पहिल्याच दिवशी २०% मुलांना सिंगल डोस मिळाला. केंद्राने म्हटले की, राज्यांनी शाळांत लसीकरण केंद्र तयार करावे. जेवढे डोस मुलांनी एका दिवसात घेतले तेवढे डोस घेण्यासाठी अमेरिकेत ३३ दिवस लागले होते. यावरून देशात मुलांमध्ये डोस घेण्याचा उत्साह किती आहे हे दिसते.
शाळेतील लसीकरणाविषयी लवकरच निर्णय : टोपे
साधारणत: १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुले चंचल असतात, खूप फिरतात, यामुळे त्यांचे लसीकरण होणे खूप गरजेचे होते, ते आज सुरू झाले. आता १२ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचीही मागणी केंद्राकडे केली आहे. मुलांच्या लसीकरणाची मोहीम शाळेत राबवण्याची इच्छा होती, पण लसीकरणानंतर काही त्रास झाल्यास तत्काळ उपाय करणे गरजेचे आहे, त्यामुळे दवाखान्यातच लसीकरण सुरू केले. शाळेमध्येही लसीकरण करण्यासाठी लवकरच निर्णय घेऊ, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. जालन्यातील जिल्हा स्त्री रुग्णालयात सोमवारी सकाळी लहान मुलांच्या लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी लॉकडाऊनची परिभाषा प्रत्येक राज्यात वेगळी आहे. त्यामुळे लॉकडाऊनबाबत सर्वच राज्यांना समान प्रोटोकॉल लागू करावा, अशी मागणीही केंद्राकडे केल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोनाविरुद्धच्या युद्धात किशोरांनीही सरसावल्या बाह्या
- पहिल्या दिवशी अरुणाचल, चंदीगड, लक्षद्वीप, मणिपूर, मेघालय, तेलंगण आणि पुदुचेरीत १५ ते १८ वर्षांपर्यंतच्या २%
पेक्षा कमी मुलांना पहिला डोस देण्यात आला.
- सोमवारी देशात विक्रमी १.१२ लाख लसीकरण केंद्रे तयार केली होती, ती मंगळवारीही सुरू राहतील.
-४ राज्यांत १५% वर किशोरांना लस, महाराष्ट्रात केवळ २.९%
तिसरी लाट : देशात एकाच दिवसात 35,879 रुग्ण, दिल्लीत 84% रुग्ण आता ओमायक्रॉनचे
देशात संसर्ग दर ३.८% वर गेला आहे. म्हणजेच १००० चाचण्यांमागे ३८ रुग्ण आढळत आहेत. २७ डिसेंबरला इतक्या चाचण्यांत ५ रुग्ण मिळाले होते. बंगालमध्ये दर १००० चाचण्यांत १५९, महाराष्ट्रात ९७ मिळताहेत. या राज्यांत चाचण्या २-३ पट कमी होत आहेत.
देशात ६ दिवसांत ६ पट नवे रुग्ण वाढले. इतका वेग कोणत्याही देशात नाही. गेल्या २४ तासांत सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्र (१२,१६०) व प. बंगाल (६,१५३) मध्ये आढळले. तथापि, केरळ (७८) वगळता सर्व राज्यांत रोज होणारे मृत्यू १० पेक्षा कमीच आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.