आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकर्नाटकात निवडणुकीच्या रणधुमाळीत दुधाच्या बाजारपेठेत वादाला उकळी फुटली आहे. गुजरातचा आनंद दूध संघ, अमूलने बंगळुरूच्या बाजारपेठेत प्रवेश करण्याची घोषणा केली आहे. यासोबतच अमूल आणि कर्नाटक दूध महासंघ यांच्या विलीनीकरणाचीही शक्यता वर्तवली जात आहे. कर्नाटक दूध महासंघाचे उत्पादन राज्यात “नंदिनी’ नावाने विकले जाते. नंदिनीची उत्पादने चांगली असून राज्यातील जनतेला अमूलची गरज नसल्याचे सांगत काँग्रेस नेत्यांनी राज्यातील अमूलच्या प्रवेशाला विरोध केला आहे.
आम्ही आमचे शेतकरी आणि त्यांच्या उत्पादनांचे संरक्षण करू, असे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांनी सांगितले. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अमूलची उत्पादने खरेदी करू नका आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी स्थापन केलेल्या कर्नाटक दूध महासंघाला वाचवा, असे आवाहन केले. ते म्हणाले की, राज्यात पूर्वी हिंदी लादली, आता अमूल.राज्याचे आरोग्यमंत्री के. सुधाकर म्हणाले की, नंदिनीची उत्पादने कोणत्याही ब्रँडशी स्पर्धा करण्यास सक्षम आहेत.
नड्डांच्या निवासस्थानी उमेदवारांवर चर्चा नवी दिल्ली | भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या निवासस्थानी शनिवारी गृहमंत्री अमित शहा तसेच कर्नाटकचे नेते येडियुरप्पा, मुख्यमंत्री बीआर बेम्मई यांनी उमेदवारांच्या नावांवर चर्चा केली. केंद्रीय निवडणूक समिती आणि संसदीय मंडळाची रविवारी बैठक होणार असून, त्यात अंतिम नावांवर शिक्कामोर्तब होऊ शकते.
तवे वाटल्याने काँग्रेस उमेदवारावर गुन्हा राजराजेश्वरी नगर मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार कुसुमा एच, खासदार डीके सुरेश आणि इतर तिघांवर मतदारांना भेटवस्तू दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकांना फ्राइंग पॅन(तवा) वाटल्या जात असल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांना मिळाली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.