आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवी दिल्ली:न्यूमोनियाची पहिली स्वदेशी लस आठवडाभरात, सीरमच्या लसीला जागतिक आरोग्य संघटनेकडून मंजुरी

पवनकुमार|नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारतात न्यूमोनियाने दरवर्षी दीड लाख मुलांचा मृत्यू होतो

न्यूमोनियापासून बचावासाठी जगातील तिसरी आणि भारतातील पहिली लस बाजारात येण्यासाठी तयार आहे. ती पुढील आठवड्यात लाँच केली जाईल. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने न्यूमोनियापासून बचावासाठी (पीसीव्ही) लस विकसित केली आहे. आतापर्यंत भारतात फायझर या अमेरिकी कंपनीने तयार केलेल्या लसीचा वापर होत होता. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, पुढील आठवड्यात भारतात विकसित न्यूमोकोकल कॉन्जगेट व्हॅक्सिन (पीसीव्ही) सर्वांसाठी उपलब्ध होऊ शकेल. या लसीची किंमत सध्या उपलब्ध न्यूमोकोकल लसींपेक्षा अनेक पट कमी असेल. भारताच्या ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियातर्फे लसीला परवाना मिळाला आहे.

भारतात न्यूमोनियाने दरवर्षी दीड लाख मुलांचा मृत्यू

केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील तज्ज्ञांच्या मते, भारतात न्यूमोनियामुळे दरवर्षी पाच वर्षांखालील जवळपास दीड लाख मुलांचा मृत्यू होतो. त्यापैकी जवळपास अर्ध्या म्हणजे ७५ हजार मुलांचा मृत्यू या लसीमुळे रोखला जाऊ शकतो.

बातम्या आणखी आहेत...