आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • First Join The Party, Then Talk About 'Join India', BJP President Nadda's Challenge To The Congress Party

टोला:आधी पक्ष जोडावा, नंतर ‘भारत जोडो’बद्दल बोलावे, भाजपचे अध्यक्ष नड्डा यांचा काँग्रेस पक्षाला टोला

चंदीगडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेसमधील अनेक वरिष्ठ नेत्यांनी अलीकडच्या काळात पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे भारत जोडो यात्रा वगैरेबद्दल बोलण्याच्या आधी काँग्रेसने पक्षातील गळती थांबवावी, आधी पक्ष जोडावा, असा सल्ला भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी दिला आहे.हरियाणातील कैथल येथे शुक्रवारी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. काँग्रेसला आता कोणताही तात्त्विक असा आधार नाही किंवा हा राष्ट्रीय तसेच प्रादेशिक पक्षदेखील राहिलेला नाही. हा पक्ष आता बहीण-भावापुरता संकोचला गेला आहे. एका परिवारापुरता राहिला आहे, अशी टीका नड्डा यांनी केली. गुलाम नबी आझाद यांनी पक्ष सोडल्याविषयी नड्डा म्हणाले, ५० वर्षे पक्षासाठी खर्ची घातलेल्या लोकांना पक्ष का सोडावा लागत आहे, याचा तुम्ही विचार केलाय? काँग्रेसचे नेते आता भारत जोडोचे आवाहन करत आहेत. आधी तुमच्या पक्षाला एकजूट करून दाखवा.

भारत जोडो अभियान राबवण्याऐवजी ‘काँग्रेस जोडो’ मोहीम राबवण्याची खरी गरज असल्याचे नड्डा यांनी सांगितले. पुढील आठवड्यापासून काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला कन्याकुमारीतून सुरुवात होणार आहे. कन्याकुमारी ते काश्मीर अशी ही यात्रा असेल. यात्रा ३ हजार ७५० किलोमीटर आणि १५० दिवसांची आहे. काँग्रेसासारखीच शिवसेनादेखील आता परिवारापुरती मर्यादित पार्टी झाली आहे. खऱ्या शिवसेनेने त्यांची साथ सोडली आहे, अशी टीका नड्डांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी सामान्य लोकांच्या आयुष्यात बदल घडवू पाहत आहेत.

बातम्या आणखी आहेत...