आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक कार्यक्रम जाहीर:गुजरातमध्ये काँग्रेसची पहिली यादी जाहीर

अहमदाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरात विधानसभेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी काँग्रेसने आपल्या ४३ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून यात राज्यसभा सदस्य अमीबेन याज्ञिक, माजी प्रदेशाध्यक्ष अर्जुन मोढवाडिया आणि मुहवा येथे औद्योगिक प्रकल्पाविरुद्ध आंदोलन करणारे डॉ. कनुभाई कलसरिया यांची नावे आहेत.

मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचा घाटलोडिया मतदारसंघ येथे सर्वात चर्चित जागा असून येथे पटेल यांच्याविरुद्ध अमीबेन याज्ञिक यांना मैदानात उतरवले जाईल. राजकोटमधून हितेशभाई व्होरा, गांधीधाममधून भारत सोळंकी आणि पोरबंदर येथून मोढवाडिया लढतील.

बातम्या आणखी आहेत...