आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंकीपॉक्सचा संसर्ग:मंकीपॉक्समुळे पहिल्या मृत्यूची पुष्टी, बाधितांची देशातील संख्या सहावर

नवी दिल्ली14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केरळमध्ये ३० जुलै रोजी २२ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला होता. सोमवारी त्याच्या नमुन्यामध्ये मंकीपॉक्सचा संसर्ग झाल्याच्या दाव्याला पुष्टी मिळाली. तरूणाचे नमुने परीक्षणासाठी पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही) येथे पाठवण्यात आले होते. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. हा तरूण २१ जुलै रोजी यूएईमधून परतला होता. तेथेही तो बाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. ३० जुलै रोजी या तरूणाचा मृत्यू झाला होता. मृताच्या संपर्कात आलेल्या २० जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. दिल्लीत राहणाऱ्या ३५ वर्षीय नायजेरियान व्यक्ती मंकीपॉक्सने बाधित असल्याचे आढळून आले आहे. दिल्लीत या आजाराने ग्रस्त असलेला दुसऱा बाधित आढळून आला आहे. राजस्थानातही एक संशयित आढळून आला. त्याचे नमूने पुण्याच्या व्हायरोलॉजी प्रयोगशाळेला पाठवण्यात आले आहेत. देशातील एकूण बाधितांची संख्या ६ वर गेली आहे. केंद्राने मंकीपॉक्ससाठी टास्क फोर्सची स्थापना केली आहे.

बातम्या आणखी आहेत...