आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • First Set Of Private Trains To Be Introduced By 2023, All 151 Such Services By 2027

खासगी ट्रेनसाठी टाइमलाइन:2023 मध्ये 12 ट्रेन्सचा पहिला सेट येईल; 2027 पर्यंत सर्व 151 गाड्या चालू होतील

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मेड इन इंडिया असतील सर्व ट्रेन्स, रेल्वेला 30 हजार कोटींच्या गुंतवणुकीची आशा

रेल्वेने प्रायवेट सेक्टरच्या मदतीने चालवल्या जाणाऱ्या ट्रेन्ससाठी टाइमलाइन ठरवली आहे. यानुसार, 2023 मध्ये खासगी ट्रेनचा पहिला सेट येईल. यात 12 ट्रेन्स असतील. तसेच, 2027 पर्यंत सर्व 151 ट्रेन आणल्या जातील.

काय आहे योजना ?

रेल्वेने आपल्या नेटवर्कवर प्रायवेट पॅसेंजर ट्रेन सुरू करण्याची योजना आखली आहे. या योजनेअंतर्गत 151 मॉडर्न पॅसेंजर ट्रेन्स चालवण्यासाठी प्रायवेट सेक्टरमधी प्रस्ताव मागवले आहेत. प्रायवेट ट्रेन्स 109 जोडी रुटवर चालवल्या जातील. या ट्रेन चालवण्यासाठी खासगी कंपन्यांकडून सुरुवातील 30 हजार कोटींची गुंतवणूक केली जाईल.

नोव्हेंबरपर्यंत फायनल होईल आरएफएक्यू

प्रायवेट ट्रेन्स चालवण्यासाठी भारतीय रेल्वेने 8 जुलैला रिक्वेस्ट फॉर क्वालीफिकेशन (आरएफक्यू) साठी जाहिरात जारी केली होती. नोव्हेंबरपर्यंत फायनल होण्याची आशा आहे. रेल्वेकडून ठरवलेल्या टाइमलाइननुसार, फायनांशियल बिड मार्च 2021 मध्ये उघडल्या जातील आणि 31 एप्रिल 2021 पर्यंत योग्य अर्जदाराची निवड केली जाईल.

मेड इन इंडिया ट्रेन असतील

रेल्वेने सांगितले की, 70 टक्के ट्रेन्स भारतात तयार केल्या जातील. या ट्रेन्सला 160 किलोमीटर प्रती तासांच्या मॅक्सिमम स्पीडसोबत तयार केले जाईल. 130 किलोमीटर प्रती तासांच्या स्पीडने प्रवासात 10% ते 15% कमी वेळ लागेल, तर 160 किलोमीटरच्या स्पीडने 30% वेळेची बचत होईल. 

आरएफक्यूनुसार, प्रायवेट कंपन्यांना रेल्वेला वास्तविक वापराच्या आधारे फिक्स्ड हौलेज चार्ज, एनर्जी चार्ज द्यावा लागेल. याशिवाय रेव्हेन्यूचा वाटा ठरलेल्या शेअरनुसार होईल. रेल्वेला या 151 ट्रेन्सकडून 3000 कोटी रुपये वार्षीक हौलेज चार्ज मिळण्याची आशा आहे. या ट्रेन्समध्ये ड्रायवर आणि गार्ड भारतीय रेल्वेचे असतील. या ट्रेनचे ऑपरेशन आणि मेंटेनेंस भारतीय रेल्वेच करेल.