आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • First Snowfall In Kashmir Valley; Temperatures Have Dropped Drastically In Several Parts Of Northern India

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बर्फवृष्टी:काश्मीर खाेऱ्यात पहिली बर्फवृष्टी; काही भागात साचला 2 फूट थर, राजधानी दिल्लीसह उत्तर भारताच्या अनेक राज्यांत तापमानात प्रचंड घट

श्रीनगर (​​​​​​​मुदस्सीर कुलू)2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • काश्मीरच्या अनेक भागांत हिमस्खलनाचा इशारा

जम्मू-काश्मीरमध्ये खाेऱ्यासह अनेक भागांत हंगामातील पहिली बर्फवृष्टी झाल्याने पर्यटकांचे चेहरे खुलले आहेत. गेल्या आठवड्यात तीन दिवसांत काही ठिकाणी तुरळक, तर काही ठिकाणी मुसळधार बर्फवृष्टी झाली. त्यामुळे खाेऱ्याच्या तापमानात घट झाली आहे. रात्री तापमान शून्याहून उणे नीचांकी जात आहे. आता काश्मिरींनी पारंपरिक कांगडीचा वापर आणि पारंपरिक पाेशाख फेरन परिधान करण्यास सुरुवात केली आहे. कांगडी म्हणजे पारंपरिक हीटर हाेय. कडाक्याच्या थंडीत शरीराची उष्णता कायम राखण्यासाठी काश्मीरमध्ये लाेक कांगडी या स्वस्त आणि प्रभावी अशा पर्यायास पसंती देतात. काश्मीर खाेऱ्यात थंडीच्या दिवसांत जेवणासाठी आधीपासून तयारी करावी लागते. कारण बर्फवृष्टी झाल्याने श्रीनगर-जम्मू महामार्ग बंद हाेताे. ताे खाेऱ्याला उर्वरित देशाशी जाेडणारा एकमेव मार्ग आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या पूर्ततेमधील अडथळा लक्षात घेऊन लाेकांनी आगामी आठवड्यासाठी भाजीपाल्याची साठवण सुरू केली आहे. हवामान विभागाचे संचालक साेनम लाेटस म्हणाले, २४ नाेव्हेंबरपर्यंत मैदानी भागात हवामान शुष्क राहील. परंतु गुलमर्गसह काश्मीरच्या घाटमाथ्यावर बर्फवृष्टी हाेईल.

काश्मीरच्या अनेक भागांत हिमस्खलनाचा इशारा
काश्मीरमधील विविध भागांसाठी बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. बुधवारी उत्तर काश्मीरच्या अरुंद भागात हिमस्खलनामुळे सैन्यातील एका जवानाचा मृत्यू झाला आणि दाेन सैनिक जखमी झाले. अलीकडेच झालेल्या बर्फवृष्टीने श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्गही बंद करण्यात आला हाेता. खाेऱ्याला उर्वरित देशाशी जाेडणारा मार्ग बर्फवृष्टी व हिमस्खलनामुळे बंद हाेताे. त्यामुळे माेठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान हाेते. महामार्ग बंद झाल्याने ३० टक्के माल खराब झाला. अर्थव्यवस्थेत १० हजार काेटी रुपयांच्या बागवानी उद्याेगाचा वाटा आहे. राज्यात ७ लाख कुटुंबे किंवा ३५ लाख लाेकसंख्या (५० टक्के) प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष बागवानीवर अवलंबून आहे. महामार्ग बंद झाल्याने त्यांचे माेठे नुकसान हाेते.

हरियाणातही थंडीची लाट

दिल्ली, हरियाणा व पश्चिम उत्तर प्रदेशच्या अनेक भागांत दोन दिवसांपासून थंडीची लाट सुरू आहे. किमान तापमान १० अंश सेल्सियसपेक्षा निचांकी नोंदवले जात आहे. ते सरासरीहून साडे चार अंश कमी आहे. ही स्थिती रविवारी सकाळपर्यंत राहण्याची चिन्हे आहेत. या दरम्यान पाकिस्तानकडून एक नवा पश्चिमेकडील विक्षोभ शनिवारी धडकणार आहे. परिणामी दोन-तीन दिवसांत म्हणजे २२ ते २५ नोव्हेंबर दरम्यान जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखडंच्या डोंगराळ भागात बर्फवृष्टी होईल. उत्तराखंडच्या ऋषिकेश, हरिद्वार, डेहराडूनमध्ये सौम्य ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडू शकतो. दरम्यान दिल्लीत शुक्रवारी निचांकीचा विक्रम नोंदवण्यात आला. सफदरजंगमध्ये किमान तापमान ७.५ अंश सेल्सियस नोंदवण्यात आले. १४ वर्षांतील हे सर्वांत निचांकी तापमान असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser