आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • First Solar Eclipse Of 2021 Today Sutak Is Not Valid In Country; News And Live Updates

वर्षातील पहिले सूर्यग्रहण आज:देशात दुपारी 1.42 ते संध्याकाळी 6.41 पर्यंत फक्त लडाख आणि अरुणाचलमध्येच दिसणार सुर्यग्रहण

नवी दिल्ली10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ऑक्टोबर 2022 चे सूर्यग्रहण देशात दिसेल

आज वर्षातील पहिले सूर्यग्रहण आहे. हे सूर्यग्रहण अमेरिका, युरोप आणि आशियामध्ये दिसणार आहे. तर सूर्यास्त होण्यापूर्वी भारतातील लडाख आणि अरुणाचल प्रदेशमध्ये पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे 148 वर्षांनंतर शनि जयंतीच्या दिवशी हे सूर्यग्रहण होत आहे. यापूर्वी शनी जयंतीच्या पार्श्वभूमीवर हे सूर्यग्रहण 26 मे 1873 रोजी झाले होते.

संकेतस्थळ टाईम अँड डेटच्या माहितीनुसार, भारतात हे सूर्यग्रहण 1.42 ते संध्याकाळी 6.41 पर्यंत राहणार आहे. म्हणजेच भारतात सूर्यग्रहणाचा अवधी पाच तास राहणार आहे.

भारतात जेथे सूर्यग्रहण दिसेल तेथेच सूतक असणार
सूर्यग्रहणाचे सूतक ग्रहण हे 12 तासांपूर्वीच सुरु होते. शास्त्रांच्या माहितीनुसार, सूर्यग्रहण जेथे दिसते. तेथेच सुतक मानले जाते. परंतु, यावेळी हे सूर्यग्रहण फक्त लडाख आणि अरुणाचल प्रदेशमध्येच दिसणार आहे. त्यामुळे हे दोन्ही राज्य वगळता संपूर्ण भारतात सुतक नसणार आहे.

सूर्यग्रहण म्हणजे काय?
जेव्हा पृथ्वी आणि सुर्यादरम्यान चंद्र येतो तेव्हा त्याला सूर्यग्रहण म्हणतात. या दरम्यान, सूर्यावरून येणारा प्रकाश चंद्र मध्यभागी आल्यामुळे पृथ्वीवर पडत नाही. फक्त चंद्राची सावलीचं पृथ्वीवर पडते. परंतु, वास्तविकतेमध्ये पृथ्वी सूर्याभोवती तर चंद्र पृथ्वीभोवती फिरत असतो. या कारणास्तव ते तिघेही एकमेंकाना अनुरुप येतात. याला सूर्यग्रहण असे म्हणतात.

रिंग ऑफ फायर म्हणजे काय?
चंद्र पृथ्वीभोवती एका लांब वर्तुळाकार कक्षात फिरत असतो. त्यामुळे पृथ्वी आणि चंद्र यामधील अंतर कधी कमी होते तर कधी वाढत असते. जेंव्हा चंद्र पृथ्वीपासून अंतर जातो तेंव्हा त्याला अॅपोजी म्हणतात. आणि जवळ येतो तेव्हा पॅरीजी म्हणतात.

10 जूनला चंद्र पृथ्वीपासून दूर असल्याने त्याची प्रतिमा लहान दिसेल. त्यामुळे ते जेंव्हा सूर्यासमोर येईल त्याचा आकार सूर्यापेक्षा लहान असल्याने ते एका रिंग सारखे दिसेल. चंद्राच्या पृष्ठभागाच्या काठावरील काही प्रकाश पृथ्वीवर पडत राहील. जेव्हा पृथ्वीवरून पाहिले जाईल तेव्हा ते एका लाल गोल भागासारखे दिसेल. यालाच रिंग ऑफ फायर म्हणतात.

ग्रहणाचा परिणाम नाही, त्यामुळे मंदिरे बंद राहणार नाहीत, ना दान-स्नान होईल
पं. मनीष शर्मा यांच्या म्हणण्यानुसार, जेथे ग्रहण दिसणार नाही तेथे याचा कोणताही परिणाम होणार नाही. म्हणजे ना मंदिरे बंद राहतील. ना स्नान- दान होईल. शनी सूर्याचा पुत्र आहे. सूर्याची पत्नी छाया असल्याने शनीचा रंग काळा आहे. ते नेहमी निळे वस्त्र परिधान करतात. मनू हे यमराज यांचे बंधू तसेच यमुना त्यांची बहीण आहे. त्याला सूर्याची प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी 27 वर्षे लागतात.

ऑक्टोबर 2022 चे सूर्यग्रहण देशात दिसेल
विज्ञान प्रसारक सारिका म्हणाल्या, मध्य प्रदेश आणि देशातील बहुतेक भागात सूर्यग्रहण पाहण्यासाठी 25 ऑक्टोबर 2022 पर्यंत थांबावे लागेल, ज्यामध्ये अंशत: सूर्यग्रहण एक तासापेक्षा जास्त काळ दिसू शकेल. हायब्रिड सूर्यग्रहण 20 एप्रिल 2023 रोजी होईल, परंतु ते भारतात दिसणार नाही.

सूर्यग्रहण पाहताना कोणती खबरदारी घ्यावी?
वर्षातील हे पहिले सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाहीये. परंतु, पुढे जरी कधी सूर्यग्रहण पाहायचे झाल्यास या गोष्टींची काळजी घ्या.

  • उघड्या डोळ्याने सूर्यग्रहण पाहू नका. सूर्यकिरण आपल्या डोळ्यांना नुकसान करू शकतात.
  • सूर्यग्रहण पाहण्यासाठी केवळ खास बनवलेल्या चष्मांचा वापर करा. साधे चष्मे वापरु नका.
  • कॅमेरा, दुर्बिणी किंवा टेलीस्कोपच्या सहाय्याने सूर्यग्रहण पाहण्याचा प्रयत्न करू नका.
  • आपण पिनहोल प्रोजेक्टरच्या मदतीने सुरक्षितपणे सूर्यग्रहण पाहू शकता.
  • आपल्याला इंटरनेटवर पिनहोल प्रोजेक्टर बनवण्याचे सोपे मार्ग सापडतील.
बातम्या आणखी आहेत...