आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • First The Corona Prolonged The Marriage, Then The Road Was Swept Away; After The Father Built The Bridge, News And Live Updates

दिव्य मराठी विशेष:आधी कोरोनामुळे लग्न लांबले, नंतर रस्ता वाहून गेला; वरपित्याने पूल बांधल्यावर निघाली वरात

बेतिया (बिहार)एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • डोक्यावर पगडी, हातात बूट घेऊन वर निघाला गावातून

डाेक्यावर पगडी अाणि हातात बूट घेऊन पूल अाेलांडणाऱ्या एका वराची हतबलता बिहारच्या रामनगरमधील चुडीहरवा गावातून निघालेल्या वरातीत दिसून अाली. रामनगर व अासपासच्या भागात सतत पडत असलेल्या पावासामुळे नदीतील पाण्याची पातळी वाढत अाहे. तसेच ठिकठिकाणी पाणीही साचले अाहे. गुदगुदी पंचायतीतल्या चुडिहरवा गावातही पुरामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाले अाहे. वाहतुकीवरही परिणाम झाला अाहे.

त्यामुळे मुलाची वरात घेऊन जाण्यासाठी पारसलाल श्रीवास्तव यांनी स्वखर्चाने पाणी साचलेल्या ठिकाणी बांबूच्या काड्यांचा पूल तयार केला. त्यानंतर श्रीवास्तव यांची वरात निघू शकली. हा पूल अाेलांडून ही वरात भंगहा (नेपाळ) येथे पाेहचली. रस्त्यात गुडघाभर पाणी साचलेले असल्याने बँडबाजाची गाडी वरातीसाेबत जाऊ शकली नाही. लग्न झाल्यानंतर वधू-वर याच पुलावरून घरी अाले. गुदगुदी पंचायतीचे प्रमुख नसीम अख्तर म्हणाले, या ठिकाणी पंतप्रधान रस्ते याेजनेंतर्गत पूल बांधण्यासाठी परवानगी मिळालेली अाहे.

गुडघाभर पाण्यातून निघाली वरात
येथील ग्रामस्थांनी सांगितले की, बबलूचे लग्न अाधीच ठरले हाेते. परंतु काेराेना काळातील लाॅकडाऊनमुळे ते पुढे ढकलण्यात अाले हाेते. गावातील काेराेना संसर्गाचे प्रमाण कमी झाल्यावर वर-वधूने लग्न करण्याचा प्रयत्न केला तर पावसामुळे नवीन विघ्न अाले. या भागात पावसामुळे खूप पाणी साचले हाेते. पारसलाल म्हणाले, हरहा नदीचे पाणी वाढल्यानंतर वरात जाणे शक्य नव्हते. त्यामुळे अखेर या नदीवर पूल बांधण्याचा निर्णय घेतला.

बातम्या आणखी आहेत...