आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीयांची बचत करण्याची पद्धत बदलली:प्रथमच म्युच्युअल फंडातील गुंतवणूकदार मुदत ठेवीदारांपेक्षा जास्त

नवी दिल्ली/मुंबई10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ३५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांचा मुदत ठेवींवर विश्वास, त्यापेक्षा लहान म्युच्युअल फंडांकडे वळतात

देशात प्रथमच म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या मुदत ठेवीदारांपेक्षा जास्त झाली आहे. ‘बँक बझार’ च्या ताज्या सर्वेक्षणात ५७% लोकांनी कबूल केले की त्यांनी या वर्षी म्युच्युअल फंडांमध्ये (एसआयपी/एकरकमी) गुंतवणूक केली. ५४% लोकांनी सांगितले की त्यांनी मुदत ठेवींद्वारे बचत केली. २०% पेक्षा जास्त लोकांनी दोन्ही पर्याय निवडले. बहुतांश मुदत ठेवीदार ३५ पेक्षा जास्त वयाचे आहेत. तर, म्युच्युअल फंडाचे बहुतेक गुंतवणूकदार २२ ते ३४ वर्षे वयोगटाचे आहेत. सर्वेक्षणात ३५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ६७% लोकांनी सांगितले की त्यांनी मुदत ठेवींचा पर्याय निवडला. २२ ते २७ वयोगटातील ५९% नोकरदार तरुणांनी म्युच्युअल फंडात गुंतवणुकीस प्राधान्य दिले. म्युच्युअल फंडावर विश्वास ठेवणारे सर्वाधिक ६७% लोक ईशान्येकडील राज्यांतील असल्याचेही हे सर्वेक्षण सांगते. ६५% लोक पंजाब-हरियाणा-दिल्ली या उत्तरेकडील राज्यांतील आहेत. तर, सर्वात कमी ४६% लोक दक्षिणेकडील राज्यांतील आहेत.

गुंतवणूकदारांचे पैसे या प्रकारांमध्ये म्युच्युअल फंड ५७% मुदत ठेवी ५४% विमा/युलिप ४६% शेअर बाजार ४५% सोने/चांदी ३३% भविष्य निधी/पीपीएफ ३१% शासकीय याेजना १४% बहुतेक नाेकरदार ६ वेगवेगळ्या प्रकारे गुंतवणूक करत आहेत. १% कुठेही गुंतवणूक करत नाहीत.

{४४% नाेकरदार निवृत्तीपूर्वी १ कोटी रुपयांपेक्षा जास्त उद्दिष्ट असलेली गुंतवणूक करतात. त्यापैकी १६% चे लक्ष्य २ कोटी रुपये आहे. ५६% नोकरदार लोकांचे लक्ष्य १ कोटी रुपयांपेक्षा कमी आहे.

प्रथमच... एसआयपीद्वारे गुंतवणूक करण्यात पुरुषांपेक्षा महिला पुढे सर्वेक्षण अहवालानुसार महिलांची बचत करण्याची पद्धतही झपाट्याने बदलली आहे. हा बदल कोरोना कालावधीनंतर येऊ लागला. या वर्षी गुंतवणूक करणाऱ्या ६०% महिलांनी कबूल केले की त्या एसआयपीद्वारे गुंतवणूक करत आहेत. त्याच वेळी, एसआयपीद्वारे गुंतवणूक करणाऱ्या पुरुषांची सरासरी ५५% आहे. ३ वर्षांपूर्वीपर्यंत, एसआयपीद्वारे गुंतवणूक करणाऱ्या महिलांची सरासरी ४०% पेक्षा कमी होती. दुसरीकडे, शेअर बाजारात थेट गुंतवणूक करणाऱ्या पुरुषांची संख्या अजूनही महिलांपेक्षा जास्त आहे, हा कलदेखील कायम दिसताे. सरासरी ४१% महिलांच्या तुलनेत ४८% पुरुषांनी शेअर बाजारात गुंतवणूक केल्याचे मान्य केले. सर्व प्रकारांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या ३४% महिलांनी कबूल केले की त्यांनी या वेळी क्रिप्टोमध्येही गुंतवणूक केली आहे.

{नोकरदार महिलादेखील निवृत्ती निधीबाबत सर्वात गंभीर असतात. ६८% नोकरदार महिला सेवानिवृत्ती निधीसाठी पैसे जोडत आहेत, तर केवळ ५४% नोकरदार पुरुष असे करतात.

बातम्या आणखी आहेत...