आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • First Year Of ModNarendra Modi Government Anniversary One Year Update In Pictures; One Year Of Modi 2.0

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फोटोंमध्ये पंतप्रधान मोदी:नरेंद्र मोदी सरकार 2.0 चे एक वर्ष पूर्ण, पाहा या एका वर्षातील काही खास क्षण

नवी दिल्ली10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
हा फोटो 23 मे 2019 चा आहे, जेव्हा लोकसभा निवडणुकीत भाजपला 303 जागा मिळाल्या होत्या. तेव्हा नरेंद्र मोदी आणि अमित शाह कार्यकर्त्यांना धन्यवाद देण्यासाठी भाजप मुख्यालयात आले होते. - Divya Marathi
हा फोटो 23 मे 2019 चा आहे, जेव्हा लोकसभा निवडणुकीत भाजपला 303 जागा मिळाल्या होत्या. तेव्हा नरेंद्र मोदी आणि अमित शाह कार्यकर्त्यांना धन्यवाद देण्यासाठी भाजप मुख्यालयात आले होते.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाला एक वर्ष पूर्ण होत आहेत. याप्रसंगी आम्ही तुम्हाला दाखवत आहोत, एका वर्षापूर्वी निवडणूक जिंकण्यापासून ते नुकत्याच आलेल्या अम्फान वादळामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींसोबत केलेल्या हवाई दौऱ्यापर्यंतचे पंतप्रधान मोदींचे खास 14 फोटो आणि त्यामागील गोष्टी...

हा फोटो 12 ऑगस्टला डिस्कवरी चॅनलवर प्रसारित झालेल्या मॅन व्हर्सेस वाइल्ड कार्यक्रमातील आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी दिसले होते. या कार्यक्रमाची शूटींग उत्तराखंडच्या जिम कॉर्बेट पार्कमध्ये झाली होती. या शो ला 180 देशात टेलीकास्ट केले होते.

अमेरिकेतील ह्यूस्टूनमध्ये मागच्या वर्षी 23 सप्टेंबरला हाउडी मोदी कार्यक्रम झाला होता. या कार्यक्रमात अमेरिकेत राहणाऱ्या 50 हजारांपेक्षा जास्त भारतीयांनी यात सहभाग नोंदवला होता. या कार्यक्रमात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उपस्थित होते.

मागच्या वर्षी 8 ऑक्टोबरला दसरा सण होता. याप्रसंगी पंतप्रधान मोदींनी दिल्लीतील द्वारकामधील दसरा मैदानात रावण दहन केले होते.

ऑक्टोबरमध्ये चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग भारत दौऱ्यावर आले होते. यादरम्यान ते तमिळनाडूमध्ये पोहचले होते. येथे चेन्नईमध्ये पंतप्रधान मोदींनी जिनपिंग यांना येथील प्राचीन शहर महाबलीपुरम दाखवले. या फोटो त्या वेळेसचा आहे. मोदी-जिनपिंग नारळ पाणी पित आहेत.

हा फोटो महाबलीपुरमचा आहे. मोदी येथे मॉर्निंग वॉकसाठी निघाले होते. मोदींच्या या फोटोमध्ये त्यांच्या हातातील वस्तू पाहून अनेक युझर्सनी त्यांना त्या वस्तुबद्दल विचारले होते. त्यावर मोदींनी उत्तर दिले होते की, हे एक अॅक्यूप्रेशर रोलर आहे, याचा ते नेहमी वापर करतात.

मागच्या वर्षी 19 ऑक्टोबरमध्ये पंतप्रधान मोदींनी आपल्या निवासस्थानी बॉलीवूड कलाकारांची भेट घेतली होती. गांधीजींच्या 150व्या जयंतीनिमित्त त्यांनी या भेटीचे आयोजन केले होते. या कार्यक्रमानंतर मोदींनी सर्व कलाकारांसोबत एक सेल्फी घेतली होती.

हा फोटो दिवाळीचा आहे. मागच्या वर्षी 27 ऑक्टोबरला पंतप्रधान मोदी जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये तैनात जवानांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी गेले होते. पंतप्रधान बनल्यापासून दरवर्षी मोदी जवानांसोबत दिवाळी साजरी करतात.

हा फोटो मागच्या वर्षी 26 डिसेंबरचा आहे. त्या दिवशी सूर्य ग्रहण होते. मोदींनी हा फोटो ट्विटरवर शेअर करत लिहीले होते- अनेक भारतीयांप्रमाणे मीदेखील सूर्य ग्रहण पाहण्यासाठी उत्साहित होतो, पण ढग आल्यामुळे याला पाहू शकलो नाही. परंतू, मी लाइव्ह स्ट्रीमच्या माध्यमातून कोझिकोड (केरळ) वरुन ग्रहण पाहीले.

हा फोटो मागच्या वर्षी 9 डिसेंबरचा आहे. त्यावेळी भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अरुण शौरी पुण्यापासून 60 किमी दूर आपल्या बंगल्यात बेशुद्ध पडले होते. त्यांना पुण्यातील रूबी हॉल क्लीनिकमध्ये भरती करण्यात आले होते. त्यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी मोदी त्यांच्याकडे गेले होते.

हा फोटो 12 जानेवारीचा आहे. स्वामी विवेकानंदांच्या जयंतीप्रसंगी मोदी कोलकाताच्या बेलूर मठात गेले होते. यादरम्यान त्यांनी रामकृष्ण मंदिरात जाऊन रामकृष्ण परमहंस यांना श्रद्धांजली अर्पण केली होती.

हा फोटो 24 फेब्रुवारीचा आहे, जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले होते. दौऱ्याच्या पहिल्या दिवसी ट्रम्प, मेलानिया आणि मोदींनी अहमदाबादमधील साबरमती आश्रमाला भेट दिली होती.

हा फोटो फेब्रुवारीतील आहे, जेव्हा नरेंद्र मोदी दिल्लीच्या हुनर हाटमध्ये पोहचले होते. येथे त्यांनी लिट्टी-चोखा खाल्ला होता.

हा फोटो 14 एप्रिलचा आहे, जेव्हा मोदींनी 21 दिवसांच्या लॉकडाउनला 19 दिवसांसाठी 3 मे पर्यंत वाढवले होते. यादरम्यान त्यांनी हात जोडून देशवासियांना घरात राहण्याची अपील केली होती.

हा सर्वात ताजा फोटो आहे. 22 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पश्चिम बंगालमध्ये अम्फान प्रभावित परिसराचा हवाई सर्वे केला होता. यादरम्यान त्यांच्यासोब पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी होत्या. दोघांचा हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. सर्वेनंतर मोदींनी बंगालसाठी 1 हजार कोटींच्या मदतीची घोषणा केली होती.

बातम्या आणखी आहेत...