आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Five Air India Pilots Test Covid 19 Negative On Re Testing After They Return From China

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना टेस्ट निगेटिव्ह:कर्मचारी पॉझिटिव्ह असल्याने एअर इंडियाचे मुख्यालय सील! 5 वैमानिकांची दुसरी चाचणी निगेटिव्ह

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • शनिवारच्या चाचणी 5 पायल आढले होते कोरोना पॉझिटिव्ह, दुसऱ्या चाचणीत निगेटिव्ह

एअर इंडियाच्या त्या 5 वैमानिकांना आता कोरोना व्हायरसची लागण झाली नाही अशी माहिती मंगळवारी नव्याने समोर आली आहे. यापूर्वी शनिवारी घेण्यात आलेल्या चाचणीमध्ये हे पाचही वैमानिक कोरोना पॉझिटिव्ह सापडले होते. आता मात्र, दुसरी चाचणी घेतली असता त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. विशेष म्हणजे, वैमानिकांची चाचणी निगेटिव्ह आली तरीही त्या दिवशी एक ड्रायव्हर आणि एक कर्मचाऱ्याची टेस्ट पॉझिटिव्ह होती ती तशीच आहे. यानंतर मंगळवारी एअर इंडियाचे हेडक्वार्टर सील करण्यात आले. सोबतच, संचालकांसह सर्वच अधिकारी आता घरातून काम पाहत आहेत. कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने हेडक्वार्टरला सॅनिटाइज केले जात आहे.

लॉकडाउननंतरही एअर इंडियाचे काही कार्गो विमान इतर देशांचे प्रवास करत आहेत. याच दरम्यान 18 एप्रिल रोजी आरोग्य सामुग्रीसाठी एक विमान दिल्लीहून ग्वांगझो विमानतळापर्यंत गेले होते. बोइंग 787 विमान यानंतर शांघाय आणि हाँगकाँगला सुद्धा जाउन आले. याच विमानात हे पाच पायलट होते. 20 एप्रिलनंतर ते कुठेही गेले नव्हते.

77 वैमानिकांची कोरोना चाचणी

गेल्या शनिवारी एअर इंडियाच्या 77 वैमानिकांची चाचणी घेण्यात आली होती. त्यानंतरच 5 वैमानिक कोरोना पॉझिटिव्ह आहेत असे सांगण्यात आले होते. या लोकांमध्ये कोरोनाची कुठलीही लक्षणे नव्हती. तरीही त्यांना मुंबईत होम क्वारंटाइन करण्यात आले होते. हे सर्वच पायलट बोइंग 787 ड्रीमलायनर्स एअरक्राफ्ट हाताळत होते. त्यांना वंदे भारत मिशन अंतर्गत विविध देशांमध्ये पाठवण्यात येणार होते. त्यापूर्वीच त्यांची कोरोनाची चाचणी घेण्यात आली.

वंदे भारतचा दुसरा टप्पा 15 मे पासून

वंदे भारत मिशनचा पहिला टप्पा 7 मे ते 14 मे पर्यंत चालणार आहे. यामध्ये 12 देशांत अडकलेल्या 14 हजार 800 भारतीयांना आणण्याचा प्लॅन आहे. आतापर्यंत या देशातून 5 हजार भारतीय सुखरूप मायदेशी परतले. या मोहिमेचा दुसरा टप्पा 15 मे पासून सुरू होणार आहे. यामध्ये मध्य आशिया, युरोपातील कझाखस्तान, उज्बेकिस्तान, रशिया, जर्मनी, स्पेन आणि थायलंड येथून भारतीयांना आणले जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...