आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट:तामिळनाडूच्या मदुराईमधील घटना, 5 जण ठार तर अनेक जखमी

5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तामिळनाडूतील मदुराई जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. जिल्ह्यातील एका फटाक्यांच्या कारखान्याला आग लागल्यानंतर भीषण स्फोट झाला आहे. आग इतकी भीषण होती की, कारखान्यात काम करणाऱ्या पाच कामगारांचा मृत्यू झाला आहे. परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, कारखान्यात झालेल्या स्फोटाचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

कारखान्याला आग लागल्याची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. याची माहिती तातडीने अग्निशमन दलाला देण्यात आली. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. पोलिसही घटनास्थळी दाखल झाले.

पाच जणांचा मृत्यू
मदुराई एसपींनी पाच जणांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. एसपींनी सांगितले की, मदुराई जिल्ह्यातील उसिलामबत्ती भागाजवळ एका फटाक्यांच्या कारखान्यात आग लागली. आगीचे कारण समजू शकले नाही. सध्या तपास सुरू आहे. याप्रकरणी दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असं त्यांनी नमूद केले.

हापूरच्या अवैध फटाका फॅक्ट्रीत स्फोट

हापूरमध्ये अवैधपणे सुरू असणाऱ्या फटाक्याच्या एका कारख्यान्यात शनिवारी भीषण स्फोट झाला. त्यात 11 मजूर ठार, तर 13 जण जखमी झाले. जखमींवर दिल्लीच्या सफदरजंग व मेरठ स्थित रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कारखान्यातील दारुगोळ्यात स्फोट झाल्याने ही घटना घडली. घटनास्थळी युद्धपातळीवर बचाव मोहीम राबवण्यात येत आहे. विशेष म्हणजे या कारखान्याला विजेचे साहित्य तयार करण्याचा परवाना होता. पण, त्यात फटाके तयार केले जात होते. येथे वाचा पुर्ण बातमी

मध्य प्रदेशात अवैध फटाका गोदामात स्फोट

मध्य प्रदेशच्या मुरैना येथील फटाक्यांच्या अवैध गोदामात झालेल्या स्फोटात तिघांचा मृत्यू झाला. स्फोट इतका जोरदार होता की, ज्या इमारतीत फटाके बनवले जात होते ती इमारत पूर्णपणे कोसळली. फटाके बनवणारे अनेक लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले. 4 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. बनमोर शहराजवळील जैतपूर गावात ही दुर्घटना घडली. येथे वाचा पुर्ण बातमी

बातम्या आणखी आहेत...