आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Five Injured In Grenade Attack On BJP Leader's House In J K's Rajouri; News And Live Updates

भाजप नेत्याच्या घरावर हल्ला:दहशतवाद्यांनी राजौरीमध्ये फेकले 3 ग्रेनेड, 5 जखमी; कुलगाममध्ये बीएसएफच्या ताफ्यालाही करण्यात आले लक्ष्य

श्रीनगर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एका वर्षात 6 भाजप नेत्यांवर हल्ला

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा भाजप नेत्याला लक्ष्य केले आहे. गुरुवारी रात्री दहशतवाद्यांनी राजौरीतील भाजप नेत्याच्या घरावर ग्रेनेडने हल्ला केला आहे. या घटनेत 5 लोक गंभीर जखमी झाले आहे. माध्यमांच्या माहितीनुसार, हा हल्ला खांडली भागातील भाजपचे मंडळ अध्यक्ष जबसीर सिंह यांच्या घरावर करण्यात आला आहे. दरम्यान, या ग्रेनेडचा स्फोट सिंह यांच्या घरावरील छतावर झाला. घटनेनंतर सुरक्षा दलांकडून संबंधित भागाला सील करण्यात आले आहे.

बीएसएफच्या ताफ्यालाही करण्यात आले लक्ष्य
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या कुरापतीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. दहशतवाद्यांनी गुरुवारी भाजप नेत्याच्या घरावर तर दिवसा बीएसएफच्या ताफ्यावर हल्ला केला. यानंतर सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना घेराव घालत गोळीबार सुरु केला. दरम्यान, या चकमकीत 2 सैनिक तर 2 सामान्य नागरिक जखमी झाले. हा हल्ला काजीगुंड भागातील मालपोरातील जम्मू-काश्मीर हायवेवर झाला.

एका वर्षात 6 भाजप नेत्यांवर हल्ला
जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्यांवरील हल्लात वाढ झाली आहे. 9 ऑगस्ट रोजी अनंतनाग येथे दहशतवाद्यांनी गुलाम रसूल डार आणि त्यांच्या पत्नीची गोळ्या झाडून हत्या केली होती. यापूर्वी 8 जुलै रोजी भाजप नेते वसीम बारी यांनादेखील ठार मारण्यात आले होते. दहशतवाद्यांनी एका वर्षात 6 भाजप नेत्यांवर हल्ला केला आहे.

बातम्या आणखी आहेत...