आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कट उघडकीस:पंजाबलगत पाकिस्तान सीमेवर पाच किलो आरडीएक्स जप्त, पाच राज्यांतील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारवाई

नवी दिल्ली/ श्रीनगर4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमृतसरजवळ पाक सीमेलगत गावात एका रस्त्याच्या बाजूला पिशवीत अशी स्फोटके ठेवण्यात आली होती. - Divya Marathi
अमृतसरजवळ पाक सीमेलगत गावात एका रस्त्याच्या बाजूला पिशवीत अशी स्फोटके ठेवण्यात आली होती.

पंजाब, उत्तर प्रदेशसह पाच राज्यांत होऊ घातलेली विधानसभा निवडणूक आणि प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पंजाबमध्ये पाकिस्तान सीमेलगत करण्यात आलेल्या एका कारवाईत पोलिसांनी पाच किलो आरडीएक्स जप्त केले आहे. अमृतसरपासून जवळ ही स्फोटके सापडल्याने सुरक्षा दलांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. दुसरीकडे दिल्लीतही गाजीपूर मंडी भागात आयईडी ठेवलेली एक बेवारस बॅग सापडली. बॉम्बनाशक पथकाने तत्काळ हा आयईडी निष्क्रिय केल्याने पुढील धोका टळला.

पाच राज्यांतील निवडणुका आणि पाकिस्तान सीमेवरून असलेला घुसखोरी आणि घातपाताचा धोका पाहता पंजाब पोलिस आणि इतर सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत हे ५ किलो आरडीएक्स सापडले. अमृतसरजवळ पाकिस्तान सीमेलगत असलेल्या धनोए कला गावात स्फोटकाचा हा साठा सापडला. अटारी-वंचीविंड मार्गावर एका बॅगमध्ये हे आरडीएक्स ठेवण्यात आले होते. पंजाब एसटीएफचे उपमहासंचालक रशपालसिंग यांनी सांगितले की, गुप्तचरांमार्फत अचूक माहिती मिळाल्यानंतर या भागात शोधमोहीम सुरू करण्यात आली. या भागातून आरडीएक्ससह १ लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. हे स्फोटक आणि नोटा पाकिस्तानमधूनच भारतीय हद्दीत पाठवण्यात आले असल्याचे पुरावे उपलब्ध आहेत, असे सिंग म्हणाले.

श्रीनगरमध्येही आयईडी सापडला
दरम्यान, केवळ पंजाबच नव्हे, तर उत्तर प्रदेशसह जम्मू-काश्मीरपर्यंत पाच राज्यांतील निवडणुका आणि २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताकदिनी घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने सीमेवरून दहशतवादी संघटनांच्या कारवाया सुरू असून शुक्रवारीच श्रीनगरच्या नौहट्टा भागात एका गजबजलेल्या चौकात एक आयईडी सापडला. ताे तत्काळ निष्क्रिय करण्यात आला. या पार्श्वभूमीवर गुप्तचर संस्थांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पाच राज्यांतील निवडणुका आणि पाकिस्तान सीमेवरून असलेला घुसखोरी आणि घातपाताचा धोका पाहता पंजाब पोलिस आणि इतर सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत हे ५ किलो आरडीएक्स सापडले. अमृतसरजवळ पाकिस्तान सीमेलगत असलेल्या धनोए कला गावात स्फोटकाचा हा साठा सापडला. अटारी-वंचीविंड मार्गावर एका बॅगमध्ये हे आरडीएक्स ठेवण्यात आले होते. पंजाब एसटीएफचे उपमहासंचालक रशपालसिंग यांनी सांगितले की, गुप्तचरांमार्फत अचूक माहिती मिळाल्यानंतर या भागात शोधमोहीम सुरू करण्यात आली. या भागातून आरडीएक्ससह १ लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. हे स्फोटक आणि नोटा पाकिस्तानमधूनच भारतीय हद्दीत पाठवण्यात आले असल्याचे पुरावे उपलब्ध आहेत, असे सिंग म्हणाले.

ज्या पाच राज्यांत निवडणुका होऊ घातल्या आहेत त्यातील पंजाब हे पाकिस्तान सीमेलगत असल्याने सर्वात संवेदनशील राज्य आहे. या भागात एरवी घुसखोरी किंवा सीमापार दशतवादी कारवाया कमी झाल्या असल्या तरी निवडणुकीमुळे हा धोका आता अधिक वाढल्याचे या घटनेमुळे स्पष्ट झाले आहे.

दिल्लीतही अलर्ट
दिल्लीत शुक्रवारी ३ किलोचा आयईडी सापडल्याने खळबळ उडाली. गाझीपूर फुलमंडी भागात ही कारवाई करण्यात आली. एनएसजीच्या बॉम्बनाशक पथकाने तत्काळ हा आयईडी निष्क्रिय केला. यात आरडीएक्स आणि अमोनियम नायट्रेटचा वापर करण्यात आला होता. पंजाबमधील पठाणकोट येथील लष्करी तळावर घातपात करण्याचा कट आखणाऱ्या एका आरोपीला नुकतीच अटक करण्यात आली होती. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी नुकतेच अडीच किलो आरडीएक्स आणि १२ जिवंत काडतुसे जप्त केली होती.

बातम्या आणखी आहेत...