आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Five Labourers Died While Cleaning Waste Water Tank Of Chemical Company In Gandhinagar

मोठी दुर्घटना:गांधीनगरमध्ये केमिकल प्लांटमधील सांडपाण्याची टाकी साफ करताना 5 कामगारांचा मृत्यू, विषारी वायूमुळे दगावले!

गांधीनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरातची राजधानी गांधीनगरमधील कलोल भागातील खत्रज गावात शनिवारी पाच मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हे कामगार औषध कारखान्याच्या दूषित पाण्याच्या टाकीची साफसफाई करत होते. रसायनयुक्त पाण्याच्या विषारी परिणामामुळे या सर्वांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

टुटसन फार्मा प्रायव्हेट लिमिटेड नावाची औषध निर्माण करणारी कंपनी जीआयडीसी प्लॉट नंबर 10, ब्लॉक नंबर 58, खत्रज, कलोल येथे आहे. कंपनीतून बाहेर पडणाऱ्या दूषित पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी येथे ईटीपी प्लांट बसवण्यात आला आहे. येथे दूषित पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर केला जातो.

कंपनीतून बाहेर पडणाऱ्या दूषित पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी प्लांट उभारण्यात आला आहे.
कंपनीतून बाहेर पडणाऱ्या दूषित पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी प्लांट उभारण्यात आला आहे.

विनय कुमार नावाचा मजूर पायऱ्यांवरून खाली आला आणि प्लांटचे खांब साफ करू लागला. यादरम्यान त्याला आरडाओरडा ऐकू आल्याने सुनील गुप्ता त्यांना वाचवण्यासाठी टाकीत उतरले. यानंतर देवेंद्र राजन कुमार आणि अनिश टाकीत उतरले आणि पाचही जणांचा मृत्यू झाला. कामगारांचा आरडाओरडा ऐकून गार्डने पोलिस आणि अग्निशमन दलाला माहिती दिली. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. घटनेची माहिती मिळताच कंपनीचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले.

याबाबत प्रादेशिक अग्निशमन अधिकारी महेश मोड यांनी सांगितले की, कारखान्यात सुरक्षा उपकरणे ठेवण्यात आली होती, मात्र कामगारांनी त्यांचा वापर केला नाही. रसायनयुक्त पाण्याच्या विषारी परिणामामुळे या सर्वांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पोस्टमॉर्टमनंतर नेमकी स्थिती कळेल.

येथे दूषित पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर केला जातो.
येथे दूषित पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर केला जातो.

मृत कामगारांची नावे...
- विनय कुमार
- सुशी गुप्ता
- देवेंद्र कुमार
- अनिश कुमार
- राजन कुमार

बातम्या आणखी आहेत...