आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्घटना:तलावात बुडून 5 तरुणांचा मृत्यू, 2 जण बुडताना पाहून इतर तिघांनी मारल्या उड्या; गुजरातच्या बोताडची घटना

बोताड (गुजरात)17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरातच्या बोताड शहरातील कृष्णसागर तलावात शनिवारी बुडून 5 तरुणांचा बुडून मृत्यू झाला. 2 तरुण तलावात पोहोण्यासाठी गेले होते. पोहताना अचानक दोघेही बुडू लागले. त्यांनी आरडाओरडा केला. ते पाहून काठावर बसलेल्या इतर 3 तरुणांनी तलावात उडी घेऊन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. पण दुर्दैवाने या घटनेत या पाचही जणांचा मृत्यू झाला. सर्व मृत तरुण 13 ते 17 वर्षे वयोगटातील आहेत. हे सर्व एकाच परिसरातील रहिवासी होते.

सर्व मृत बोताड शहरातील सारंगपूर परिसरात राहत होते.
सर्व मृत बोताड शहरातील सारंगपूर परिसरात राहत होते.

दीड तासानंतर मृतदेह सापडले
या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षकांसह अग्निशमन दल व गोताखोरांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. अग्निशमन दलाने सुमारे दीड तासांच्या प्रयत्नानंतर पाचही मृतदेह बाहेर काढले. मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आलेत. सर्व मुले महमदनगर परिसरात राहत होते.

पाचही मृत तरुण मित्र होते. ते अनेकदा तलावाच्या काठावर फिरण्यास जात असत.
पाचही मृत तरुण मित्र होते. ते अनेकदा तलावाच्या काठावर फिरण्यास जात असत.

पाचही जणांना पोहणे येत नव्हते
जुनैद अल्ताफ काझी या मृत तरुणाच्या कुटुंबीयांनी सांगितले की, मृतांपैकी कुणालाही पोहणे येत नव्हते. सर्वजण दुपारी घरातील कुणालाही कल्पना न देता घराबाहेर पडले. घटनेपूर्वी 1 तास अगोदर ते परिसरातीलच एका दुकानावर बसले होते. हे पाचही तरुण मित्र होते. ते बऱ्याचदा तलाव परिसरात फिरण्यासाठी जात होते.

मृत तरुणांची नावे

  • अहमद उर्फ भावेश वाधवानिया (16 वर्षे)
  • अश्रफ उर्फ रुमित वाधवानिया (13 वर्षे)
  • जुनैद अल्ताफ काझी (17 वर्षे)
  • असद आरिफ खंभाती (16 वर्षे)
  • फैजान (16 वर्षे)