आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
हरियाणातील रोहतकच्या जाट कॉलेजमध्ये कुस्तीच्या टीम आखाड्यात पाच राष्ट्रीय खेळाडूंच्या सामूहिक हत्याकांडात पोलिस मुख्य आरोपी सुखविंदरचा शोध घेत आहेत. पोलिस महासंचालक या प्रकरणाची निगराणी करत आहेत. आखाड्याच्या प्रशिक्षकांतील वैयक्तिक वैमनस्य हे या हत्याकांडामागील कारण असल्याचे सांगितले जाते. हा आखाडा नाेंदणीकृत नव्हता. यात प्रत्येक खेळाडूकडून दोन हजार रुपये प्रतिमहिना घेतला जात होता. आखाड्यात सध्या सुमारे १०० खेळाडू सराव करत होते. आजकाल हा आखाडा महिन्याच्या दोन लाख रुपयांच्या कमाईचे साधन ठरला होता. या पैशांवर प्रशिक्षकांची नजर होती. कुणालाही तो सोडायचा नव्हता. मनोज मलिक जाट कॉलेजच्या शारीरिक शिक्षण विभागाचे प्रमुख होते. त्यामुळे आखाड्याची सूत्रे त्यांच्या हाती होती. परंतु प्रशिक्षक सुखविंदर मोर यांना आखाड्याची सूत्रे आपल्या हाती असावीत, कमाईतदेखील वाटा असावा, असे वाटे. मनोजला डीपीईची नोकरी होती. त्याची पत्नीही रेल्वे विभागात होती. म्हणूनच सुखविंदरकडे सूत्रे आल्यास त्याचा वाटा जास्त असेल. त्यातच मनोजने सुखविंदरला एका वादामुळे प्रशिक्षक पदावरून हटवले होते.
तडजोड न झाल्याने सुखविंदरने घडवले गोळीकांड
प्रत्यक्षदर्शी खेळाडूंच्या म्हणण्यानुसार शुक्रवारी सायंकाळी जिम्नॅशियम हॉलमध्ये सराव सुरू होता. यादरम्यान सुखविंदरने प्रत्येक खेळाडूला एकेक करून फोनवरून विश्रांती कक्षात बोलावले. नंतर त्याने त्यांच्या डोक्यात व गळ्यावर गोळ्या घातल्या. साक्षी, पूजा व प्रदीप यांचा या खोलीतच मृत्यू झाला होता. सुखविंदरने त्यांच्या मृतदेहांना बेडखाली दडवले होते. मनोज मलिक, अमरजित यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. एका मुलाच्या डोक्यात गोळी लागली होती. सुखविंदर खोलीला कुलूप लावून पसार झाला होता.
सुखविंदर मुख्य आरोपी, पोलिसांनी पकडण्याठी ठेवले एक लाख इनाम
हत्याकांडात सुखविंदर मोर मुख्य आरोपी आहे. काही दिवसांपासून तो येथे प्रशिक्षक म्हणून काम पाहत होतो. काही तक्रारींनंतर मनोज मलिक यांनी सुखविंदरला पदावरून हटवले होते. याच वैमनस्यातून सुखविंदरने हत्याकांड घडवले. त्याला अटक करण्यासाठी त्याच्यावर एक लाख रुपयांचे इनाम ठेवण्यात आले आहे. त्याच्याबद्दल गुप्त माहिती मिळाल्यास पोलिसांना कळवण्यात यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. इतर आरोपीही त्यात सामील असल्याचेदेखील सध्या नाकारता येत नाही, असे पोलिसांनी सांगितले.
पहिल्या प्रशिक्षकाचा मुलगा आणि प्रशिक्षक अमरजितही गंभीर
मनोज मलिक यांचा तीन वर्षीय मुलगा सरताजची प्रकृती गंभीर बनली आहे. सरताजच्या डोक्यात गोळी लागली आहे. ही गोळी डाव्या डोळ्याजवळून गेली आहे, असे डॉक्टरांनी सांगितले. या हल्ल्यात त्याचा डोळा बाहेर आला होता. डोक्यात गोळी लागल्याने त्यांचा मुलगा कोमात गेला आहे. तो १८ तासांनंतरही शुद्धीवर आलेला नाही. अमरजितच्या जबड्यातून गोळी बाहेर पडली आहे. या घटनेने राज्यातील क्रीडा क्षेत्रात खळबळ उडाली आहे. वैमनस्यातून ही घटना घडल्याची चर्चा आहे. तपासांती वास्तव स्पष्ट होईल.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.