आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Flights Latest Update | Directorate General Of Civil Aviation (DGCA) To Airlines On Seats Allotment

फ्लाइटमध्ये सोशल डिस्टंसिंग:डीजीसीएचे विमान कंपन्यांना निर्देश- 3 जूनपासून मिडल सीट रिकामी ठेवा किंवा मधल्या प्रवाशाला प्रोटेक्टिव गाउन द्या

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सर्व प्रवाशांना थ्री-लेअर सर्जिकल मास्क, फेस शील्ड आणि सॅनिटायजर देणे बंधनकारक
Advertisement
Advertisement

डायरेक्ट्रोरेट जनरल ऑफ सिविल एविएशन (डीजीसीए) ने सर्व विमान कंपन्यांना विमानातील मधले सीट रिकामे ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, जर प्रवासी संख्या जास्त असल्यास, मधल्या सीटवर बसरणाऱ्या व्यक्तीला प्रोटेक्टिव गाउनसारखे एक्स्ट्रा इक्विपमेंट देण्यासही सांगितले आहे. हे मिनिस्ट्री ऑफ टेक्सटाइलच्या स्टँडर्डनुसारच असावेत. तसेच, एका कुटुंबातील तीन व्यक्ती असतील, तर त्यांना सोबत बसू दिले जाईल. हे नवीन निर्देश 3 जून पासून लागू केले जातील.

डीजीसीएने सांगितले की, सर्व प्रवाशांना थ्री-लेअर सर्जिकल मास्क, फेस शील्ड आणि सॅनिटायजर देण्यात यावे. पण विमानात अन्न-पाणी दिले जाणार नाही. खूप इमरजन्सी असेल, तरच अन्न-पाणी दिले जाईल.

मिडल सीट बुकिंगवर उद्या बॉम्बे हायकोर्टात सुनावनी

बॉम्बे हायकोर्टने काही दिवसांपूर्वी म्हटले होते की, वंदे भारत मिशनअंतर्गत बाहेरील देशातून येणाऱ्या विमानातील मधली सीट रिकामी ठेवण्यात यावी. एअर इंडिया आणि सरकारने याला सुप्रीम कोर्टात आवाहन दिले होते. सुप्रीम कोर्टाने 25 मे रोजी म्हटले होते की, फक्त 6 जूनपर्यंतच मधली सीट बूक करण्याची परवानगी असेल. त्यानंतर बॉम्बे हायकोर्टाता आदेश ऐकावा लागेल. यादरम्यान, डीजीसीएला वाटल्यास नियमात बदल करू शकतील. मिडल सीट बुकिंगप्रकरणी बॉम्बे हायकोर्ट उद्या (मंगळवार) परत एकदा सुनावनी घेईल. सुप्रीम कोर्टाने हायकोर्टला सांगितले होते की, दोन्ही बाजुंचे मत ऐकून अंतिम निर्णय घेतला जाईल.

Advertisement
0