आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Flood Crisis In Delhi, Mountains Collapse In Himachal; Landslide Threat In Raigad Again

हवामान:दिल्लीमध्ये पुराचे संकट, हिमाचलात डोंगर कोसळले; रायगडमध्ये पुन्हा भूस्खलनाचा धोका, स्थायी मदत शिबिर उभारणार

नवी दिल्ली/सिमला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात डोंगरापासून ते मैदानी प्रदेशापर्यंत पाऊस सुरू आहे. जोरदार पावसामुळे हरियाणातील हथनी धरणातील पाणी साेडल्यामुळे यमुना धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. जलस्तर २०५.३४ मीटरवर पोहोचला आहे. त्यामुळे दिल्लीतील अनेक भागांना पुराचा धोका वाढला आहे. प्रशासनाने संपूर्ण भागात अलर्ट जारी केला आहे. नदीकाठावरील लोकांना बचाव शिबिरांत हलवले जात आहे.

हवामान विभागाने दिल्लीसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. म्हणजे या क्षेत्रात पुढील काही दिवसांत मोठा पाऊस होऊ शकतो. दुसरीकडे हिमाचलमधील सिरमोर येथे पावसानंतर भूस्खलन होऊन रस्ते ब्लॉक झाले आहेत. बरवासच्या राष्ट्रीय महामार्ग ७०७ वरील वाहतूक थांबवण्यात आली आहे. येथे भूस्खलनामुळे डोंगराला भेग पडली आहे. डोंगराच्या कडा तुटून रस्त्यावर पडत आहेत. बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्याच्या कलिम्पोंगमध्ये भूस्खलनामुळे महामार्ग बंद करण्यात आला आहे.

महाराष्ट्र : रायगडमध्ये पुन्हा भूस्खलनाचा धोका, स्थायी मदत शिबिर उभारणार
महाराष्ट्रात रायगडात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या भूस्खलनाच्या घटनांमुळे जीवितहानी झाली असताना पुन्हा असाच धोका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने महाड आणि पोलादपूर तालुक्यातील ४१३ कुटुंबीयांना सुरक्षित स्थळी जाण्यास सांगितले आहे. पावसामुळे एकूण १,५५५ लोक प्रभावित झाले आहेत. दरम्यान, पुणेस्थित भारतीय भूशास्त्र विभागाने या भागात पुन्हा भूस्खलनाच्या घटना घडण्याची भीती व्यक्त केली आहे. त्यामुळे महाडमध्ये स्थायी मदत शिबिर उभारण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाला ५ एकर जागा देण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कोल्हापूर जिल्ह्याचा दाैरा केला.

बंगालमध्ये दार्जिलिंगचा कलिम्पोंग हायवे बंद
- हिमाचल प्रदेशात सिरमौरच्या बरवासमध्ये भूस्खलन होऊन महामार्ग -७०७ बंद झाला.
- लाहौल खोऱ्यात शांशा नाल्यावर तात्पुरता पूल बनवून अडकलेल्या लोकांना काढले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...