आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Floods Hit 35 Lakh People In 26 Districts Of Assam, Hitting 10 Lakh People In Bihar

नद्या काेपल्या:आसामच्या 26 जिल्ह्यांतील 35 लाख लोकांवर पुराचे संकट, बिहारमध्ये 10 लाख लोकांना बसला फटका

पाटणा / गुवाहाटी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 26000 गावांत स्थिती गंभीर, 51 हजार लाेक बेघर

बिहारच्या गंडक, बागमती, अधवारासह अनेक लहान-माेठ्या नद्या काेपल्या आहेत. त्यामुळे राज्यातील १० जिल्ह्यांना पुराने वेढले आहे. सुमारे १० लाख लाेकांना त्याचा फटका बसला आहे. सर्वाधिक नुकसान दरभंगाचे झाले आहे. येथे सुमारे ३.३० लाख लाेकसंख्येवर त्याचा परिणाम दिसून आला. गेल्या चाेवीस तासांत पुरामुळे राज्यात १५ लाेकांचा मृत्यू झाला. वीज काेसळून आतापर्यंत १०० हून जास्त जणांचा मृत्यू झाला.

बिहारमध्ये मान्सूनमधील आतापर्यंतचा सरासरी ५५ टक्क्यांहून जास्त पाऊस झाला. मान्सूनची अक्षीय रेखा हिमालयाच्या तराई क्षेत्रात पाेहाेचल्याने बिहारमध्ये मुसळधार पाऊस झाला. या आठवड्यात पुन्हा अक्षीय रेखा हिमालयाच्या तराई क्षेत्रात पाेहाेचण्याची शक्यता आहे. त्यामुळे २७ ते ३० जुलै पर्यंत बिहारच्या उत्तर भागात जाेरदार वृष्टी हाेऊ शकते. या क्षेत्रात सुमारे १४ जिल्हे आहेत. रविवारी राज्यात मुसळधार पावसाची शक्यता नाही. अक्षीय रेषा नेपाळवरही परिणाम करेल. त्यामुळे बिहारच्या उत्तरेकडील जिल्ह्यांतील स्थिती आणखी वाईट हाेऊ शकते.

नद्या काेपल्या, धरणे फुटली : पूर्व चंपारण, पश्चिम चंपारण, गाेपालगंज, सुपाैल व सारण जिल्ह्यांतील जलप्रकल्प फुटल्याने हजाराे लाेकांवर बेघर हाेण्याची वेळ आली आहे. एनडीआरएफच्या ताफ्याने या जिल्ह्यांत अडकलेल्या सुमारे साडेतीन हजार लाेकांना सुरक्षित ठिकाणी पाेहाेचवले. रेल्वे पूल, रुळ बुडाल्याने किमान १० मार्गांवर रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे.

रेल्वेचा मार्गही बदलला आहे. गाेपालगंजमध्ये ७२ व सारणच्या २८ गावांतील परिस्थिती वाईट आहे. एनडीआरएफच्या ८ तुकड्या बचाव कार्यात सक्रिय आहेत. राज्याचे जल संधारण मंत्री संजय झा म्हणाले, गंडक नदीत अचानक ५.३५ लाख क्युसेक पाण्याचा दबाव वाढल्याने त्याचा परिणाम धरणावर पडला. त्यातून अनेक बंधारे फुटले. हवाई दलाच्या तीन हेलिकाॅप्टरची मदत घेत दरभंगा, माेतीहारी, गाेपालगंजमध्ये सामग्री पाेहाेचवली जात आहे. २७१ कम्युनिटी किचन चालवले जात आहेत. ११ लाख लाेकांच्या भाेजनाची येथे व्यवस्था करण्यात आली आहे.

२६०० गावांत स्थिती गंभीर, ५१ हजार लाेक बेघर
आसाममधील ३६ जिल्ह्यांतील सुमारे ३५ लाख लाेकांना पुराचा फटका बसला. मुसळधार पाऊस, पूर व भूस्खलनामुळे येथे आतापर्यंत १२२ जणांचा मृत्यू झाला. लाेक नावेत बसून आपल्या बुडालेल्या घरांना असहाय्यपणे पाहत हाेते. सुमारे ५१ हजार लाेक निर्वासित छावण्यांत मुक्कामी आहेत. अनेक गावे, छाेटी शहरे यांचा संपर्क तुटला आहे. सामान पाेहाेचवण्यासाठी नावेची मदत घ्यावी लागत आहे. पूरग्रस्त लाेकांना धान्य, मास्क, चारा इत्यादी सामग्री दिली जात आहे. पुरामुळे सुमारे २६०० गावांतील परिस्थिती वाईट झाली. सुमारे १.१६ लाख हेक्टर कृषी भूमी खराब झाली आहे.