आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादैनंदिन वापराच्या व जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीने त्रासलेल्या भारतवासीयांसाठी हाेळीसह सणासुदीच्या ताेंडावर खुशखबर आहे. गहू, मैदा, सुजी, रव्याचे दर गेल्या महिन्याच्या तुलनेत १०-१४ टक्क्यांनी कमी झाले. जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत गव्हाचे भाव प्रतिक्विंटल ३,२०० पर्यंत हाेते. आता ते २,२०० रुपये प्रतिक्विंटलवर आले आहे. केंद्र सरकारची ओपन मार्केट स्कीमअंतर्गत ५० लाख टन गहू बाजारात उतरवला. एफसीआयने २४ लाख टन गव्हाची विक्रीही केली. केंद्राने गव्हाची किमान आधारभूत किंमत प्रतिक्विंटल २,३५० रुपये केली आहे.
दर-फरक (रु. प्रति किलाेग्रॅम)
1 फेब्रु. 15 फे. 2 मार्च फरक%
पीठ 35 34 31 -11
मैदा 36 33.6 31 -13
सुजी 36.4 34 31.4 -13
रवा 36.6 34.2 31.6 -13
गहू 28.65 24.9 23.15 -19
स्रोत: केंद्रीय ग्राहक विभाग
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.