आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउत्तराखंडच्या चमोलीमध्ये हिमकडा तुटल्यानंतर जमा झालेल्या ढिगाऱ्यामुळे ऋषिगंगा नदीची अपस्ट्रीम (वरील प्रवाह) थांबला आहे. नदीचा प्रवाह थांबल्यामुळे येथील पाण्याचे तलावात रुपांतर झाले असून, आता भीती आणखी वाढली आहे. हा तलाव फुटला, तर वेगाने येणाऱ्या पाण्यामुळे महापूराची परिस्थिती निर्माण होऊ शकते. दुर्घटनेनंतर आय सॅटेलाइट इमेज आणि ग्राउंड झीरोकडून आलेल्या जानकारांच्या रिपोर्टमध्ये ही माहिती देण्यात आली आहे.
जिथे हिमकडा तुटला आहे, तो भाग हिमालयातील खूप उंच भाग आहे. त्या भागाला रौंटी पीक म्हटले जाते. रौंटी पीकपासून हिमकडा तुटल्यानंतर तो थेट ऋषिगंगा नदीत पडला नाही. तर, हिमकडा खुप साऱ्या ढिगाऱ्यासह ज्या भागात आला, त्याला रौंटी स्ट्रीम म्हटले जाते. रौंटी स्ट्रीम थोडा खाली येऊन, दुसऱ्या दिशेने येणाऱअया ऋषिगंगाला जाऊन मिळते. रौंटी स्ट्रीमपासून आलेला वेगाचा प्रवास आणि ढिगाऱ्यामुळे ऋषिगंगा नदीत पूर आला. यामुळे ऋषिगंगावर बनलेले दोन पॉवर प्रोजेक्ट उद्धवस्त झाले.
पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर स्पष्टपणे दिसत आहे की, हिमकडा तुटल्यानंतर रौंटी स्ट्रीम आणि ऋषिगंगाच्या संगमावर ढिगारा आणि चिखल जमा झाला आहे. ज्यामुळे तिथे एक तात्पुरता बांद तयार झाला अशून, ऋषिगंगाचा प्रवास तिथेच थांबला आहे. खाली डोगरावर जे पाणी येत आहे, ते रौंटी स्ट्रीमकडून येत आहे.
वाडिया इंस्टिट्यूट ऑफ हिमालयन जियोलॉजी, डेहरादूनच संचालक कलाचंद सैन याबाबत सांगतात की, 'घटनास्थळी दाखल झालेले पथक आणि एरियल फोटोग्राफमधून असे दिसत आहे की, ऋषिगंगा आणि रौंटी स्ट्रीमच्या संगमाजवळ एक तलाव तयार झाले आहे. तेथील पाणी निळ्या रंगाचे दिसत आहे, म्हणजेच हे पाणी मागील अनेक दिवसांपासून जमा होत आहे.'
जर हे धरण तुटला, तर महापूर येईल ?
कलाचंद सैन म्हणतात, हे जमा झालेले पाणी निळ्या रंगाचे दिसत असल्यामुळे अनेक दिवसांपासून साचलेल असू शकते. त्यामुळे या ठिकाणी आधीपासूनच तलाव असल्याची शक्यता नाकारता येत नाही. जर हा तलाव आधीपासूनच तिथे असेल, तर चिंता करण्याची गरज नाही.
घटनास्थळी दाखल झालेली शास्त्रज्ञांच्या रिपोर्टनुसार, ढिगारा आणि चिखल जमा झाल्यामुळे ऋषिगंगाचा प्रवाह थांबला आहे. याचा अर्थ नदीचे पाणी कुठेतरी जमा होत आहे. त्यामुळे तिथे दिसत असलेल्या तलावात किती पाणी आहे, याची माहिती घेणे आवश्यक आहे. जर तलाव मोठे असेल, तर हे तुटल्यानंतर डोंगराखालील भागात महापूर येऊ शकतो. त्यामुळे, या तलावातून पाणी काढण्याचा पर्याय शोधावा लागेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.