आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Flying Drone Seen Late Night In Kunjwani । Ratnuchak Area Of Jammu । Suspected Drone Activity; News And Live Updates

पुन्हा ड्रोनच्या हालचाली:जम्मूच्या सुंजवान मिलिटरी स्टेशनजवळ पुन्हा दिसले ड्रोन, तीन दिवसांत तिसरी घटना; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर

श्रीनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात पहिल्यांदाच ड्रोनव्दारे हल्ला

जम्मूत गेल्या तीन दिवसांत तीनदा ड्रोन आढळले आहे. या घटनेमुळे संपूर्ण भागात खळबळ उडाली असून सुरक्षा यंत्रणा अलर्टवर आहेत. माध्यमांच्या माहितीनुसार, जम्मूतील सुंजवान मिलिटरी स्टेशनजवळ संशयित ड्रोन उडताना दिसले आहे. यापूर्वी जम्मूतील कुंजवानी आणि कालूचक भागातदेखील ड्रोन आढळून आले होते. परंतु, हे तिन्ही ड्रोन एकच आहेत की वेगळे आहेत हे अद्याप निश्चित झालेले नाही.

दोन दिवसांपूर्वी 2 ड्रोन आढळून आले होते
जम्मूतील एअरफोर्स स्टेशनवर रविवारी दहशतवाद्यांनी ड्रोन हल्ला केला होता. दरम्यान, घटनास्थळावर दहशतवाद्यांनी पाच मिनटांत दोन स्फोट घडवले होते. या हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी जम्मूतील कालूचक भागातील मिलिटरी बेसवर दोन ड्रोन आढळल्याने खळबळ उडाली होती. सैन्याने ड्रोन दिसताच त्याच्यावर अंदाधूंद गोळीबार केला.

परंतु, अंधार असल्याने ते ड्रोन गायब झाले. यांनतर सैन्याकडून संबंधित भागात मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम सुरु आहे. डीडी न्यूजच्या माहितीनुसार, ही घटना रविवारी रात्री 11.30 ते 1.30 वाजेदरम्यान अनमॅन्ड एरियल व्हीकल (UAV) मिलिटरी बेसवर घडली. यानंतर सैन्य सतर्कतेवर आहे.

देशात पहिल्यांदाच ड्रोनव्दारे हल्ला
देशात रविवारी दहशतवाद्यांनी केलेल्या ड्रोन हल्ल्यात भारतीय सैन्यांचे दोन जवान जखमी झाले होते. हा हल्ला जम्मूतील एअरफोर्स स्टेशनजवळ करण्यात आला होता. विशेष म्हणजे येथून आंतरराष्ट्रीय बॉर्डर केवळ 14 किलो दूर आहे. दहशतवाद्यांनी केलेला हा ड्रोन देशातील पहिलाच ड्रोन हल्ला असल्याचे मानले जात आहे. कारण यापूर्वी कधीही असे हल्ले करण्यात आले नव्हते.

जम्मू-काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंग यांनी या हल्ल्याला दहशतवादी हल्ला असल्याचे सांगितले होते. त्यांनतर काही वेळातच भारतीय सैन्याने एका दहशतवाद्याला 6 किलो स्फोटकांसह अटक केली होती.

बातम्या आणखी आहेत...