आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Flying Saucers Are Not Part Of Any Intelligence Security Program Of America, There Is No Evidence Of Their Being From Another World; News And Live Updates

एलियन्सवर जेरेमीचा मोठा खुलासा:अमेरिकेच्या इंटेलिजेंस सिक्युरिटी प्रोग्रामचा भाग नाहीयेत 'फ्लाइंग सॉसर'; ते परग्रहावरील असल्याचा पुरावादेखील नाही

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ‘कॉन्‍स्पिरेसी थ्योरी’वर विश्वास ठेवणार्‍यांनी खोटे बोलण्याचा आरोप केला

अमेरिकेतील मिलिटरी टास्क फोर्स 25 जून रोजी संसदेत अनआयडेंटिफाइड फ्लाइंग ऑब्जेक्ट्सवर (यूएफओ) अहवाल सादर करणार आहे. कारण फ्लाइंग सॉसरमध्ये गेल्या काही दिवसांपासून अचानकपणे लोकांना आवड निर्माण झाली आहे. या फ्लाइंग सॉसरबद्दल अजूनही गूढ कायम असून हे नेमके कोणाचे आहे याबद्दल प्रश्न उद्भवत आहे. कारण जगात याबाबत अद्याप कोणतीच माहिती समोर आलेली नाही. फ्लाइंग सॉसरचे शोध लावणारे जेरेमीचा यांनी यावर मोठा खुलासा केला आहे.

याआधी हे 'फ्लाइंग सॉसर' अमेरिकेच्या इंटेलिजेंस सिक्युरिटी प्रोग्रामचा भाग असल्याचा युक्तीवाद केला जायचा. परंतु, अमेरिकन मिलिटरी टास्क फोर्सने हे आरोप फेटाळून लावले आहे. त्यामुळे हे 'फ्लाइंग सॉसर' नेमके आहे तरी कोणाचे याबाबतचे गूढ वाढतच चालले आहे. काहींच्या मते हे शत्रू राष्ट्राच्या ड्रोनप्रमाणे हेरगिरी करण्याचे साधने तर नाही ना असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. परंतु, अमेरिका हे 'फ्लाइंग सॉसर' चीन किंवा रशियाच्या गुप्तचर यंत्रनेचा भाग असल्याचा दावा करत आहे. परंतु, यामध्ये किती तथ्य आहे? याबाबत अजूनही कोणाताही खुलासा करण्यात आलेला नाही.

फ्लाइंग सॉसर्सवर संशोधन करणारे चित्रपट निर्माते जेरेमी कॉर्बेल म्हणाले की, अमेरिकन मिलिटरी टास्क फोर्सच्या अहवालात याबाबतच्या बर्‍याच गोष्टी स्पष्ट होतील. त्यांनी नुकतेच यासंदर्भात काही व्हिडियो प्रसिद्ध केले होते. त्यामध्ये त्यांनी हे व्हिडियो दावा यूएस नेव्हीच्या हाय-डेफिनिशन कॅमेर्‍याने रेकॉर्ड केल्याचे दावा केला आहे.

यापूर्वी पेंटॅगॉनने जारी केले होते तीन व्हिडियो
पेंटागॉनने काही वर्षापूर्वी तीन व्हिडियो जारी केले असून ते 2018-2019 मध्ये रडारवरुन रेकॉर्ड केले गेले असल्याचे म्हटले होते. यापूर्वी माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनीही या अनआइडेंटिफाइड एरियल फिनामिना (यूएपी) असल्याचे मानले होते. सध्याच्या विमानाच्या तुलनेत फ्लाइंग सॉसरचा वेग जास्त असल्याचे कॉर्बेल यांनी सांगितले.

‘कॉन्‍स्पिरेसी थ्योरी’वर विश्वास ठेवणार्‍यांनी खोटे बोलण्याचा आरोप केला
कॉर्बेल जॉर्ज हे नॅप यांना गुरु मानायचे. नॅप यांनी 1989 मध्ये अमेरिकेच्या इंटेलिजेंस प्रोग्राममध्ये काम करणार्‍या एका माणसाची मुलाखत घेतली होती. ज्याला नंतर 'बॉब लझार' म्हणून ओळखले जात असे. कॉर्बेल यांचे चित्रपट ‘बॉब लझार एरिया 51 अँड फ्लाइंग सॉसर्स’ मध्येही मुख्य भूमिकेत दिसला. तरीदेखील ‘कॉन्‍स्पिरेसी थ्योरी’वर विश्वास ठेवणार्‍यांनी बॉब लझार यांच्यावर खोटे बोलण्याचा आरोप केला.

बातम्या आणखी आहेत...