आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अडव्हायझरी:मोबाइलमध्ये एफएम रेडिओ सक्तीचा; तो बंद करू शकत नाही : केंद्र सरकार

नवी दिल्ली24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्येक मोबाइल फोनमध्ये एफएम रेडिओ रिसीव्हर किंवा फीचर अनिवार्यपणे उपलब्ध असावे. कोणत्याही मोबाइलमधील अंगभूत एफएम रेडिओ फीचर कोणत्याही परिस्थितीत बंद करू नये,असे केंद्र सरकारने सर्व मोबाईल फोन उत्पादकांना सांगितले आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सर्व मोबाइल फोन उत्पादकांना जारी केलेल्या अॅडव्हायजरीत म्हटले आहे की, ‘एफएम रेडिओ ही एक विश्वासार्ह प्रणाली आहे. एफएम स्टेशन नैसर्गिक आपत्तीच्या वेळी स्थानिक अधिकारी आणि नागरिक यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून काम करतात. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत सरकारला रिअल टाइममध्ये माहिती देणे एफएम रेडिओशिवाय शक्य नव्हते.

मंत्रालयाने इंडियन सेल्युलर अँड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशन (आयसीईए) आणि मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन फॉर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (एमएआयटी) यांना हा महत्त्वाचा सल्ला सर्व उद्योग संघटना आणि मोबाइल फोन उत्पादकांना प्राधान्याने पोहोचवण्यास सांगितले आहे. केंद्राने या अॅडव्हायजरीत इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन चाही (आयटीयू) हवाला दिला आहे. रेडिओ प्रसारण हा नैसर्गिक आपत्तीमध्ये लवकरात लवकर चेतावणी देण्याचा आणि जीव वाचवण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे असा विश्वास आहे. कोरोना महामारीच्या काळात महत्त्वाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यात रेडिओची मोठी मदत झाली. एफएम वाहिनी सर्वांसाठी विनामूल्य संगीत सुविधा प्रदान करते, त्यामुळे ते अधिक लोकांपर्यंत पोहोचू शकते असे उद्योग तज्ञांचे मत आहे.