आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजम्मू-काश्मिरातून कलम ३७० हटवण्याला शुक्रवारी ३ वर्षे पूर्ण झाली आहेत. हे कलम हटवण्यासोबतच २०१९ मध्ये केंद्र सरकारने राज्याची विभागणी करून दोन नवे केंद्रशासित प्रदेश बनवले होते. तेव्हापासून लोकांना वाटते की, केंद्रशासित प्रदेशाच्या दर्जामुळे लडाखला खूप फायदा झाला आहे. पायाभूत सुविधांचा विकास, शिक्षण आणि आरोग्यासाठीचा निधी अनेक पटीने वाढला आहे. रुग्णालयांमध्ये सुविधा वाढल्या आणि आधुनिकीकरण करण्यात आले. लडाखसाठी पहिल्यांदा केंद्रीय विद्यापीठ, मेडिकल व पॅरामेडिकल कॉलेज आणि ५०० खाटांच्या रुग्णालयाची घोषणा करण्यात आली. लडाख आणि काश्मीरला जोडणाऱ्या धोरणात्मक १८ किमी लांब जोझिला बोगद्याचे काम वेगाने सुरू आहे. तो २०२४ पर्यंत तयार होईल. हा बोगदा लडाख आणि काश्मीरमधील १२ महिन्यांचा प्रवास शक्य करेल.
५,९५८ कोटी बजेटअंतर्गत लडाखकडे इतका पैसा आहे की, त्यांना एका वर्षात तो खर्च करणे कठीण जात आहे. आंतरजिल्हा स्तरावर कारगिल आणि लेहचे दोन्ही नेते सातत्याने बैठका घेत आहेत. केडीएचे सदस्य सज्जाद कारगिली म्हणाले, सरकारने आमच्या मागण्यांबाबत आमच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्याचे वचन दिले होते. मात्र, त्यास उशीर होत आहे. यामुळे लडाखच्या लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. एक तज्ज्ञ म्हणाले, लडाखकडे निधीची कमतरता नाही. विद्यापीठे, मेडिकल कॉलेज आणि इतर फॅन्सी वस्तू विकासात्मक प्रकल्प असू शकतात. मात्र, सर्वकाही बाहेरील लोकांकडून नियंत्रित केले जात असेल आणि स्थानिक लोकांना अधिकार नसतील तर यामुळे काहीच साध्य होणार नाही. लोकांना अधिकार द्या आणि त्यांना ड्रायव्हिंग सीटवर बसवा. असे केले तरच खऱ्या अर्थाने लडाखचा कायापालट होईल. लडाखच्या लोकांसाठी रोजगार हा चिंतेचा विषय आहे. त्यांचे म्हणणे आहे की, केंद्रशासित प्रदेशाच्या बदल्यात आम्ही नोकऱ्या, जमिनीचा मालकी हक्क आणि व्यवसायातील सुरक्षा गमावली आहे. बाहेरील लोक येतील आणि लडाखमधील सर्व नोकऱ्या, व्यवसाय हिसकावतील, अशी त्यांना भीती आहे. गेल्या आठवड्यातच लडाख ट्रॅव्हल ट्रेड बॉडीजने बाहेरच्या लोकांनी गुंतवणूक केलेल्या ६ व्यावसायिक प्रतिष्ठानांसोबत असहकाराची घोषणा केली. यामुळे बाहेरील लोक व प्रशासनावरील त्यांचा अविश्वास दिसून येतो.
-कारगिलमध्ये हिमालय व ट्रान्स-हिमालयीन अध्ययन केंद्र, आदिवासी संशोधन केंद्र स्थापन झाले आहे. -सेंद्रिय खतांच्या वितरणासाठी ६४ गावांची निवड रासायनिकमुक्त गाव म्हणून करण्यात आली आहे. -१०,००० मेगावॅट सोलार, विंड पॉवर प्लँट लावले जात आहेत. २२००० कोटींतून ट्रान्समिशन लाइन बनेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.