आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • For 200 Years, The Deserted Village Of Khabha Has Once Again Been Crowded With People

जीवनाची नवी उमेद:200 वर्षांपासून ओसाड खाभा गाव पुन्हा माणसांनी बहरू लागलेय, पर्यटक वाढले

जैसलमेर (राजस्थान) / दीपक शर्मा6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राजस्थानमध्ये जैसलमेरपासून 33 किमीवरील गाव, स्थापत्यशैलीमुळे पर्यटकांचे आकर्षण

पर्यटनाच्या नकाशावर जैसलमेरची अमिट छाप आहे. परंतु, जैसलमेरपासून ३३ किमीवरील खाभा गावाबद्दलची माहिती फारच कमी लाेकांना आहे. हा भाग मूळचा पालीवाल समुदायाचा हाेता. २०० वर्षांपूर्वी एका शापामुळे पालीवाल ब्राह्मणांनी एका रात्रीतून ८४ गावे सोडली. होती. त्यात खाभा गावही होते. तेव्हापासून गाव आेसाड होते. आता गावाचा निम्मा भाग माणसांनी बहरल्याचे दिसते. गाव सोडून गेलेले लोकही परतू लागलेत. हळूहळू या भागात पर्यटन देखील वाढू लागले आहे. काही बॉलीवूड चित्रपटांचे चित्रीकरण देखील या भागात झाले. जैसलमेरला भेट देणारे देशी-परदेशी पर्यटक आता खाभा गावाला आवर्जून जाऊन येतात.त्यामुळे स्थानिक कारागिरांना रोजगार मिळू लागला आहे. येथील किल्ला पर्यटकांच्या मनाला आकर्षित करताे. खाभा गावातील घरांचे स्थापत्य अनाेखे आहे. अशा बांधकामाच्या शैलीमुळे गावाला एकप्रकारची तटबंदी आपाेआप बनली आहे. एखादा अनाेळखी व्यक्ती एकदा गावात आल्यास त्याला सहजपणे बाहेर पडता येत नाही.

हुंड्यात मिळाले खाभा गाव
इतिहासाचे अभ्यासक ऋषिदत्त पालीवाल म्हणाले, इतिहासानुसार खाभा गावातील जहागीरदार गाेयल राजपूत हाेते. परंतु दुसऱ्या समुदायाच्या राजपुताने वर्चस्व सांगितले. मग गाेयलने हरजल पालीवाल यांच्या मदतीने खाभाला मुक्त केले. हरजल यांचे नाव नेहड देखील हाेते. त्यांच्यासाेबत गाेयलने आपल्या मुलीचा विवाह केला. वचनानुसार पालीवालला खाभा हुंड्यात देण्यात आले हाेते.

बातम्या आणखी आहेत...