आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • For Balance, Rajouri In Jammu, Part Of Poonch Likely To Go To Anantnag Constituency | Marathi News

फेररचना:संतुलनासाठी जम्मूमध्ये राजौरी, पूंछचा काही भाग अनंतनाग मतदारसंघात जाण्याची शक्यता, पाच लोकसभा जागांसाठी प्रस्ताव

जम्मू / मोहित कंधारी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

निवृत्त न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखालील मतदारसंघ फेररचना आयोगाने आपला मसुदा अहवाल सादर केला आहे. हा प्रस्ताव सादर केल्यानंतर आता पुढील सहा महिन्यांत विधानसभा निवडणूक घेण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. विद्यमान विधानसभेचा वाढीव कार्यकाळ ६ मार्च रोजी पूर्ण होत आहे.

आयोगाने मसुदा अहवालात काश्मीर विभागात मोठ्या प्रमाणात बदल केले आहेत. आयोगाने जम्मू-काश्मीरमध्ये पाच लोकसभा मतदारसंघांत सीमा निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याद्वारे दोन्ही विभागांतून प्रत्येकी अडीच जागा मिळाव्या, असा त्यामागील उद्देश आहे. त्यानुसार राजौरी व पूंछ जिल्ह्यातील काही भागाला दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग मतदारसंघाशी जोडले जाऊ शकते. आयोगाने जम्मूतील-काश्मीरमधील मतदारसंघातही बदलाचा प्रस्ताव मांडला आहे. सुमारे ५० टक्के विधानसभा मतदारसंघांच्या सीमा भागात संतुलनासाठी फेररचना केली जात आहे. पूर्वी सीमा क्षेत्र जिल्हा मुख्यालयापर्यंत वाढवण्यात आले होते. त्या सीमा शेजारच्या जिल्ह्यातही घुसल्या होत्या. समितीच्या सदस्यांना १४ फेब्रुवारीपर्यंत आपले मत, आक्षेप नोंदवता येणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले.

नॅशनल कॉन्फरन्सला प्रस्ताव नामंजूर
प्रस्तावाचा मसुदा पाच सदस्यांनाही देण्यात आला आहे. यात तीन सदस्य नॅशनल कॉन्फरन्सचे तर दाेन भाजपचे आहेत. अनंतनाग लोकसभा मतदारसंघ फेररचनेअंतर्गत अधिकारी म्हणाले, विस्तृत अहवालात जम्मू विभागात राजौरी व पूंछला सामील करून अनंतनाग लोकसभा मतदारसंघाच्या फेररचनेचा प्रस्ताव आहे.

बातम्या आणखी आहेत...