आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • For The Benefit Of Those Who Are Delaying, This Time Should Be Reduced; Instructions Of PMO

दिव्य मराठी विशेष:याेजनांच्या लाभासाठी विलंब होत आहे, हा वेळ घटवला जावा ; पीएमओचे निर्देश

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र सरकारच्या फ्लॅगशिप योजनांच्या अमलासाठी लागणाऱ्या वेळेत कपात करण्याचा सल्ला विविध मंत्रालयांना देण्यात आला आहे. समान्य माणसाशी संबंधित योजनांचा लाभ लवकर दिला जावा हा यामागील उद्देश आहे. सुरुवातीच्या एका महिन्यात कामासाठी लागणारा सरासरी वेळ २४ तासांवर आणण्याचे लक्ष्य आहे. पुढील ३ महिन्यांपर्यंत तो ४८ ते ५२ तासांपर्यंत घटवायचा आहे. सूत्रांच्या मते आयुष्मान भारत, किसान सन्मान निधी, उज्ज्वला, जनधन खाते, मुद्रा कर्ज, जल जीवन मिशन, पीएम आवास योजनेसाठी लागणारा वेळ कमी करण्याचा सल्ला दिला गेला.

लाभार्थींची संख्या वाढवण्याचा पंतप्रधान कार्यालयाचा आग्रह आहे. लागणारा वेळ कमी झाल्यावरच हे शक्य होईल. पीएमओतील एका अधिकाऱ्याच्या मते, देखरेख प्रक्रिया गतिमान केल्यास वेळ कमी लागेल. उदा. उज्ज्वला योजनेसाठी पात्र व्यक्तीच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्यास त्याला दुरुस्त करून पुढील कामकाजाच्या दिवशी बोलावले जाते. आता ही कमतरता कशी दूर करता येईल हे सांगितले जाईल.