आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागुजरातच्या भूमीवरील काक्रापार युनिट क्रमांक ४ या वर्षी वीज उत्पादन सुरू करणार आहे. संपूर्ण स्वदेशी तंत्रज्ञानाने निर्मित ७०० मेगावॅटची दुसरी अणुभट्टी सुरू होणार आहे.अणुऊर्जा कशी निर्माण होते याची माहिती घेण्यासाठी भास्करचा चमू तेथे पोहोचला. या ठिकाणी एकदा अणुभट्टी सुरू झाल्यावर किरणोत्सर्गाचा धोका असतो व कुणीही जाऊ शकत नाही.
गुजरातमधील वापी जिल्ह्यातील काक्रापारमध्ये सध्या देशातील दुसऱ्या सर्वात मोठ्या अणुभट्टीचे काम सुरू आहे. येथे ७०० मेगावॅट अर्थात दररोज १.६८ कोटी युनिट वीज निर्मिती होईल. म्हणजे २०० युनिट वीज वापराच्या २५.२० लाख घरांना लागणारी एका दिवसाची वीज. ही केवळ ३ किलो युरेनियम-२३५ द्वारे तयार होईल. प्रकल्पाचे साइट डायरेक्टर सुनीलकुमार रॉय म्हणाले, काक्रापार अणुऊर्जा महामंडळाची अशी साइट आहे जी पूर्णपणे मेड इन इंडिया रिअॅक्टर तयार होत आहेत. आमची एक अणुभट्टी आधीपासून कार्यरत आहे आणि दुसरीही २०२३ मध्ये काम सुरू करेल. त्याचा एक-एक सुटा भाग आपल्या येथे तयार झाला आहे. आपल्या देशात उपलब्ध युरेनियम इंधनाच्या हिशेबाने हे डिझाइन केले आहे.
अणुपासून वीजनिर्मिती प्रक्रियेचे तीन आराखडे आहेत. पहिले, रिअॅक्टर बिल्डिंग, जिथे युरेनियमद्वारे वीज निर्मिती होते. दुसरे- टर्बाइन-जनरेटर बिल्डिंग- जिथे वाफेपासून वीज निर्मिती होते. तिसरे- कुलिंग टॉवर- जिथे उष्ण पाणी थंड करून पुन्हा वापरात आणले जाते. रिअॅक्टर बिल्डिंग ग्राउंड लेव्हलपासून ५३ मीटर उंच आणि जमिनीच्या आत १५ मीटर खोल असते. एका विशाल बोगद्यासदृश्य द्वारातून जात आम्ही आता इमारतीच्या आत विशाल चौकोनी बॉक्ससारख्या स्ट्रीलच्या साच्यासमोर आहोत. हे अणुभट्टी इमारतीचे पहिले एअरलॉक गेट आहे. हे २ मीटर काँक्रिटची भिंती जिच्यावर ६ एमएमच्या पाेलादी प्लेट लावली होती त्यात फिट होते. एका पाठोपाठ एक असे ३ गेट पार केले. हे तीनही एकमेकांशी लिंक असून एक उघडल्यावर दुसरे लॉक होते. हे उघडल्यावर बाहेरची हवा आत येईल, मात्र आतून किरणोत्सर्गाचा धेाका बाहेर येणार नाही. आता आम्ही अणुभट्टीच्या ठिकाणी पोहोचलो. आम्हाला छत दाखवत सांगण्यात आले की,या घुमटाकार आराखड्यावर असेच स्ट्रक्चर आहे. दोन्ही हजारो टन स्टील आणि काँक्रिटपासून तयार केले आहेत,ज्यावर क्षेपणास्त्र हल्ल्याचाही परिणाम होत नाही. अणुभट्टीच्या आत आम्ही एका चेंबरमध्ये उभे आहोत. विभागणाऱ्या भिंतीला मधमाशाच्या पोळ्यासारखे स्ट्रक्चर जोडले होते. याला कॅलेंड्रिया म्हणतात. हे अणुभट्टीचे हृदय आहे.
यात युरेनियम भरलेली पेन्सिल फिट करतात आणि त्यातच आण्विक प्रक्रियेतून वीज निर्मिती होते. या पेन्सिल्सच्या बाहेर ट्यूबमध्ये पाणी(जड पाणी) वाहत असते. याचा एवढा दाब असतो की, ३०० अंश तापमानातही वाफेत रूपांतर होत नाही. हे उच्च किणोत्सर्गाचे क्षेत्र आहे आणि अणुभट्टी सुरू असताना माणूस जाऊ शकत नाही. यानंतर आम्ही खाली कॅलेंड्रियात अणु इंधन भरण्यासाठी रोबोटिक भूजा लावलेल्या ठिकाणी गेलो. जवळपास ४ मजले वर पाण्याला प्रेशरने फिरवण्यासाठी पंप लावले होते. शास्त्रज्ञ एक मोठी मोटारच्या दिशेने इशारा करत सांगतात की, ही हजारो अश्वशक्तीच्या दाबाने पाणी पळवते आणि असे चार पंप या युनिटमध्ये आहेत. एक पंप ६ मेगावॅट वीज घेतो,जी कोणत्याही छोट्या शहरासमान आहे. या आराखड्यावर हत्तीसारखा विशाल बॉयलर होता,त्यात रिअॅक्टरमधून ३०० अंशाहून जास्त पाणी ट्यूबमध्ये फिरून साध्या पाण्याची क्षणार्धात वाफ करते. टर्बाइन बिल्डिंगमध्ये एकानंतर एक चार टर्बाइन आहेत. शेवटी आम्ही टर्बाइनला जनरेटर लावलेल्या ठिकाणी अालो. शास्त्रज्ञ म्हणाले, ही आमची लक्ष्मी. ही ७०० मेगावॅट वीज देईल.
१.६८ कोटी युनिट वीजनिर्मितीसाठी एक-एक सुटा भाग स्वदेशी
अपघात होऊ नये यासाठी फुकुशिमाच्या घटनेपासून धडा
काक्रापारमध्ये फुकुशिमापासून धडा घेऊन ८ फिचर जोडले आहेत. तिथे ते नव्हते. फुकुशिमात आण्विक इंधन जास्त गरम झाल्याने हायड्रोजन वायू तयार झाला आणि दुर्घटना झाली. आम्ही अणुभट्टीत असे उत्प्रेरक लावले आहेत जे हायड्रोजन निर्मितीत त्याचे पाण्यात रूपांतर करेल.
रिअॅक्टर स्ट्रक्चरचे डिझाइन भूकंपरोधक करण्यात आले
शास्त्रज्ञ स्ट्रक्चरमधील क्रॉसमध्ये लावलेल्या पोलादी खांबाकडे इशारा करत म्हणाले की, हा भूकंपाचा धक्का सहन करण्यासाठी बनवला आहे. म्हणजे, येथे हजारो टनाचे स्ट्रक्चर अशा झोपाळ्याशी जोडले आहे,जिथे भूकंपाचा परिणाम होणार नाही. डिझाइन भूकंपरोधक आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.