आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • For The First Time After Corona, The Number Of Domestic Passengers Crossed 3 Lakh

हवाई वाहतूक:कोरोनानंतर पहिल्यांदाच देशांतर्गत विमान प्रवाशांचा आकडा 3 लाख पार

नवी दिल्ली6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनानंतर पहिल्यांदाच देशातील विमान प्रवाशांची एका दिवसातील संख्या शनिवारी तीन लाखांवर पोहोचली. कोरोना रुग्णांच्या संख्येत घट आणि सणवारांमुळे ९ आॅक्टोबर रोजी २३४० उड्डाणांमध्ये ३,०४,०२० प्रवाशांनी प्रवास केला. सलग तिसऱ्या महिन्यात पहिल्या आठवड्यात प्रवासी संख्या वाढताना दिसून आली.

विमान वाहतूक जुलैपासून सातत्याने वाढत आहे. ९ आॅक्टोबरला देशांतर्गत विमान वाहतूक कोरोनापूर्वीपेक्षा ७६ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे, तर नागरी उड्डाणांची संख्या कोरोनापूर्व काळापेक्षा ८१ टक्के राहिली. कोरोनापूर्वी जानेवारी २०२० मध्ये एअरलाइन्सची दरराेज २,६०० उड्डाणे हाेत हाेती. यात सुमारे ३,५०,००० प्रवाशांनी प्रवास केला. देशांतर्गत वाहतुकीसाठी सरकारने सध्या ८५ टक्के क्षमतेने प्रवासी वाहतुकीची परवानगी दिली आहे, तर दुसरीकडे फेअर बँडची (कमाल व किमान) मर्यादा १५ दिवसांसाठीच असते. या वेळमर्यादेनंतर एअरलाइन्स आपल्या साेयीने भाडे ठरवू शकते.

फेअर बँडच्या घोषणेला उशीर झाल्याने तिकिटे स्वस्त
जाणकारांचे म्हणणे आहे की, सरकारने फेअर बँडची घाेषणा करण्यास उशीर केल्याने एअरलाइन्सना निश्चित मर्यादेपेक्षा कमी तिकिटे विकण्याची सूट मिळाली. यामुळे देशांतर्गत विमान प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली. फेअर बँडच्या १५ दिवसांच्या मर्यादेनंतर एअरलाइन्सला ३०-४० टक्क्यांपर्यंत स्वस्त तिकिटे विकण्यासाठी भरपूर वेळ मिळतो.

बातम्या आणखी आहेत...