आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना देशात:पहिल्यांदाच 24 तासात 3 लाखांपेक्षा जास्त रुग्ण बरे झाले, 3.92 लाख नवीन संक्रमित आढळून आले

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पहिल्यांदा बरे झालेल्या रूग्णांची संख्या 3 लाखांच्या पुढे गेली आहे. शनिवारी 24 तासांत 3 लाख 8 हजार 522 लोक बरे झाले घरी परतले. यासोबतच मागील 24 तासात 3 लाख 92 हजार 459 नवीन रूग्ण आढळले, 3,684 लोकांनी आपला जीव गमावला.

तत्पूर्वी शुक्रवारी रेकॉर्डब्रेक 4 लाख 1 हजार 911 नवीन रुग्ण आढळून आले होते. जगातील कोणत्याही देशात संक्रमित व्यक्तींमध्ये एकाच दिवसात आढळून आलेली ही सर्वात मोठी संख्या आहे. इतकेच नव्हे तर अमेरिकेत नवीन संक्रमित रुग्णांच्या संख्येपेक्षा ती सात पट आहे. संपूर्ण जगात 8.66 लाख रुग्ण आढळून आले त्यापैकी जवळपास अर्धे (46%) भारतात आढळून आले आहेत.

जगामध्ये सर्वात जास्त मृत्यूसुद्धा भारतातच होत आहेत. मागील चोवीस तासात जगभरात 14,285 लोकांचा मृत्यू झाला. यामध्ये 3,521 मृत्यू भारतात झाले आहेत. म्हणजेच जगात मागील चोवीस तासात झालेल्या मृत्यूंमध्ये प्रत्येक चौथा मृत्यू भारतात झाला आहे. यातही सर्वात जास्त मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. महाराष्ट्रात 828 लोकांचा मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...