आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बीआरओने रचला इतिहास:प्रथमच 59 दिवसांतच झोजिला खिंड मोकळी

श्रीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

११६५० फूट उंचीवरील झोजिला खिंड रविवारी विक्रमी ५९ दिवसांतच वाहतुकीसाठी खुली करण्यात आली. झोजिला जम्मू-काश्मीरला लडाखशी जोडणारी महत्त्वाची खिंड आहे. सामान्यपणे मोठ्या हिमवर्षावानंतर दरवर्षी ती नोव्हेंबर मध्यात बंद केली जाते. यानंतर मार्चचा दुसरा आठवडा ते एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात खुली केली जाते. मात्र, या वर्षी बीआरओने (सीमा रस्ता संघटना) ५९ दिवसांत मोकळी करून इतिहास रचला आहे. झोजिला खिंड सरासरी ९० ते १५० िदवस बंद राहते. संरक्षणतज्ज्ञ सांगतात की, चीनसोबतच्या वादानंतर एलएसीवर भारतीय लष्कराने तैनाती वाढवली आहे. सैनिकांसाठी लॉजिस्टिक सपोर्ट देण्यासाठी झोजिला खिंड वेळेआधीच खुली करण्यात आली आहे. ती गेल्या वर्षी ३१ डिसेंबरला वाहतुकीसाठी बंद करण्यात आली होती.

२६ किमी लांब रस्त्यावरील बर्फ १४ दिवसात हटवला : हिमवर्षावात लडाख-श्रीनगर महामार्ग ३० ते ४० फूट उंच बर्फाने झाकला जातो. चारही बाजूला बर्फाळ डोंगर आणि उंच पांढरी चादर दिसते. तापमानही उणे ३० अंशांपर्यंत जाते. लडाखचा इतर भागाशी संपर्क तुटतो. या वेळी बीआरओने जास्त उपकरणे लावून बर्फ हटवला आणि विक्रम स्थापन केला. (छाया : आबिद बट)

बातम्या आणखी आहेत...