आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • For The First Time In A Day, 1 Crore Corona Doses, The Number Of Vaccinations Has Crossed 62 Crore

भारताचा लसीकरणाचा नवा विक्रम:एका दिवसात प्रथमच 1 कोटी डोस, लसीकरणाचा आकडा 62 कोटींपार

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शुक्रवारी देशव्यापी लसीकरण अभियानांतर्गत पहिल्यांदाच एका दिवसात १ कोटी २ लाख ६ हजार लोकांना लस दिली गेली. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने सांगितले की, आतापर्यंत देशात कोरोनाचे ६२ कोटी १८ लाखांहून अधिक डोस दिले गेले. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे अजूनही लसीचे ४.०५ कोटींवर डोस उपलब्ध असून १७.६४ लाखांवर डोस पोहोचवले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कामगिरीबाबत आनंद व्यक्त करत म्हटले की, ‘रेकॉर्ड लसीकरण...एक कोटीचा आकडा ओलांडणे महत्त्वपूर्ण कामगिरी आहे. लस घेणारे आणि मोहीम फत्ते करणाऱ्यांना शुभेच्छा.’

ही राज्ये सर्वात पुढे
राज्य एकूण डोस
उत्तर प्रदेश - 6,96,95,821
महाराष्ट्र - 5,63,24,037
गुजरात - 4,50,78,816
मध्य प्रदेश - 4,46,02,010
राजस्थान - 4,22,24,518

एक मोठा पल्ला... निम्म्या लोकसंख्येचे लसीकरण
भारताने आपल्या निम्म्या प्रौढ लोकसंख्येला कमीत कमी एक डोस देण्याचा पल्ला गाठला आहे. आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, ४८.०९ कोटींवर लोकांनी पहिला आणि १४.०८ कोटी लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत. ही संख्या देशाच्या प्रौढ लोकसंख्येच्या ५० टक्क्यांहून अधिक आहे. दरम्यान, शुक्रवारी ४६,७६१ नवे रुग्ण आढळले असून केरळमध्ये ३२,८०१ नवे रुग्ण आढळले.

बातम्या आणखी आहेत...