आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • For The First Time In History, The Temple In Dwarka Will Be Closed On Janmashtami

कोरोनाचा परिणाम:इतिहासात प्रथमच जन्माष्टमीला बंद राहणार द्वारकेमधील मंदिर

द्वारकाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • उज्जैनमध्ये लोकांना मिळाली तशी सूट देण्याची पुजाऱ्यांची मागणी

गुजरातचे द्वारकेतील जगत मंदिर कोरोनामुळे दहा ते १३ आॅगस्टपर्यंत बंद राहणार आहे. १२ ऑगस्टला जन्माष्टमी आहे. इतिहासात प्रथमच जन्माष्टमीला जगत मंदिर बंद राहणार आहे. मात्र, दैनंदिन कार्यक्रम सुरूच राहणार आहेत. द्वारकाधीशांच्या जन्मोत्सवात पुजारी कुटुंबियातील सदस्यांशिवाय अन्य कोणाचाही सहभाग असणार नाही. साधारणत: या दिवसात येथे दोन लाखांहून अधिक भाविक असतात. जन्माष्टमीला जगभरातून भाविक द्वारकेला येतात. द्वारका मंदिराच्या बांधकामाची योजनाही आखण्यात आली आहे. कृष्ण भक्तांसाठी जन्माष्टमी अनोखा उत्सव आहे. द्वारकाधीश जगत मंदिराचे पुजारी प्रणवभाई यांनी सांगितले, ‘प्रशासनाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. परंतु द्वारकावासियांना द्वारकाधीशांच्या जन्मोत्सवात सहभागी व्हायला हवे. मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये लोकांना दर्शनाची सूट होती. त्याचप्रमाणे द्वारकेतील जनतेला जन्मोत्सवापासून वंचित ठेवणे योग्य नाही. त्यांना दर्शन मिळावे.

बातम्या आणखी आहेत...