आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • For The First Time In India, The Trial Of Medical Drone Delivery Will Start From June 18, Will Last For One And A Half Months; News And Live Updates

ड्रोन पोहोचवणार औषधे:भारतात पहिल्यांदाच मेडिकल ड्रोन डिलिव्हरीची चाचणी 18 जूनपासून होणार सुरु; दीड महिन्यांपर्यंत चालेल ट्रायल

बंगळुरू4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 1-2 किलो सामान 12-15 किमी पर्यंत वाहू शकेल

भारतात गेल्या वर्षी मेडिकल ड्रोन डिलिव्हरीची चाचणी मान्यता देण्यात आली होती. परंतु, कोरोना महामारीच्या वाढत्या पार्श्वभूमीवर ही चाचणी अशीच ठप्प पडलेली होती. त्यामुळे भारतात 18 जूनपासून बेंगळुरूमध्ये अधिकृतपणे या चाचणीला सुरुवात केली जाणार आहे. याला बियॉन्ड व्हिज्युअल लाईन ऑफ साइट (BVLOS) मेडिकल ड्रोन असेही म्हणतात. ही चाचणी थ्रॉटल एरोस्पेस सिस्टम्स (TAS) नावाची कंपनी करणार आहे. बेंगळुरूपासून 80 किलो मीटर अंतरावर असलेल्या गौरीबिदनूर येथे या चाचणीला सुरुवात होणार आहे. या चाचणीचा कालावधी 30 ते 45 दिवसांचा असणार आहे.

या कन्सोर्टियममध्ये थ्रॉटल एरोस्पेस सिस्टम्स (TAS) व्यतिरिक्त इनव्होली-स्विस कंपनीचा देखील समावेश आहे. इनव्होली-स्विस कंपनी व्यावसायिक ड्रोन अनुप्रयोगांसाठी हवाई रहदारी जागरूकता प्रणालीमध्ये माहिर आहेत. तर दुसरीकडे, हनीवेल एरोस्पेस सुरक्षा तज्ञ म्हणून काम करणार आहे. या कन्सोर्टियममध्ये दोन प्रकारचे ड्रोन वापरले जाणार असून यामध्ये मेडकॉप्टर आणि टीएएसचा समावेश आहे. ऑन-डिमांड डिलिव्हरी सॉफ्टवेअरचे नाव आहे रॅंडइंट (RANDINT) ठेवण्यात आले आहे.

1-2 किलो सामान 12-15 किमी पर्यंत वाहू शकेल
कंदासामी म्हणाले की, मेडकॉप्टरची छोटी आवृत्ती 1 किलो सामना 15 किलोमीटर पर्यंत नेऊ शकते. तर दुसरी आवृत्ती 2 किलो सामना 12 किलोमीटर पर्यंत वाहू शकणार आहे. ही चाचणी 30 ते 45 दिवस सुरु राहणार असून यामध्ये श्रेणी आणि सुरक्षा दोन्हीसाठी चाचण्या करण्यात येणार असल्याचे कंदासामी म्हणाले. डीजीसीएनुसार, हे उड्डाण 100 तासापर्यंत करावे लागणार आहे. परंतु, आमचे लक्ष 125 तासाचे असणार आहे. कंदासामी पुढे म्हणाले की, चाचणीनंतर हे लॉग पुनरावलोकनासाठी डीजीसीएकडे देण्यात येणार आहे.

पहिली अधिकृत मेडिकल ड्रोन डिलिव्हरी चाचणी
नागरी विमान संचालनालयाकडून (DGCA) 20 मार्च 2020 ला परवानगी मिळाल्याचे टीएएसने सांगितले. परंतु, कोरोनामुळे याच्या इतर प्रक्रिया बाकी असून त्या आता पूर्ण करण्यात आल्या आहे. टीएएसचे सीईओ नागेन्द्रन कंदासामी यांनी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले की, इतर दोन कन्सोर्टियमलाही बीव्हीएलओएस (BVLOS)परवानगी आहे. परंतु, कायदेशीरदृष्ट्या हा आमचा पहिला अधिकृत मेडिकल ड्रोन डिलीव्हरी चाचणी आहे.

बातम्या आणखी आहेत...