आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • For The First Time In The 68 year Parliamentary History, The Rajya Sabha Laksabha Will Not Function Simultaneously

पावसाळी अधिवेशन:68 वर्षांच्या संसदीय इतिहासात प्रथमच एकाच वेळी नसेल राज्यसभा-लाेकसभेचे कामकाज

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोना काळात फिजिकल डिस्टन्सिंगसह पहिले सत्र पार पडणार
  • राज्यसभा सकाळी तर लोकसभा सायंकाळी होईल सुरू; दहा दिवस चालू शकते पावसाळी अधिवेशन

कोरोना विषाणूमुळे सहा मीटर अंतर राखण्याचा पायंडा पाडल्याने भारतीय संसदेचा चेहरा बदलला आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन साथरोगाच्या अडचणींचे उदाहरण ठरणार आहे.१९५२ नंतर ६८ वर्षांच्या संसदेच्या इतिहासात प्रथमच दोन्ही सभागृहांचे कामकाज एकाच वेळी होणार नाही. राज्यसभेचे खासदार लोकसभा व प्रेक्षक गॅलरीत बसू शकतील. यामुळे फिजिकल डिस्टन्सिंगचे पालनही होईल. अशीच व्यवस्था लोकसभेसाठी वापरात येईल. यासाठी संसदेत कामाची लगबग सुरू झाली आहे. हे पावसाळी अधिवेशन कसे पार पडते, याकडे सर्व राजकीय जाणकारांचे लक्ष लागलेले आहे.

राज्यसभा सकाळी तर लोकसभा सायंकाळी होईल सुरू; दहा दिवस चालू शकते पावसाळी अधिवेशन

> नव्या बैठकीच्या क्षमतेच्या दृष्टीने राज्यसभेचे ६० सदस्य सभागृहात व ५१ सदस्य प्रेक्षक गॅलरीत बसतील. उर्वरित १३२ सदस्यांना लोकसभेच्या चेंबरमध्ये बसवण्यात येईल. यामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज एकाच वेळी होण्याऐवजी दोन वेगवेगळ्या वेळेत पार पडेल. राज्यसभा सकाळी तर लोकसभा संध्याकाळी होऊ शकते. दोन्ही सभागृहे भव्य पडद्यावर दिसतील. त्यामुळे कामकाजाच्या वेळी संपूर्ण सभागृहाचे कामकाज दिसून येईल.

> राज्यसभेच्या मुख्य चेंबरमध्ये पंतप्रधान, सभागृह नेता आणि विरोधी पक्षनेता बसतील. सर्व पक्षांच्या सभागृहाचे नेतेे चेंबरमध्येच बसतील. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग, एच. डी. देवेगौडा, लोकजनशक्ती पार्टीचे रामविलास पासवान, रामदास आठवले यांच्यासाठी आसने ठेवली आहेत.

> कामकाज सुरू असतना विरोधी पक्षास गोंधळ घालता येणार नाही. गॅलरीत बसवलेले खासदार सभागृहात येऊ शकणार नाहीत.

> एका विरोधी पक्षाच्या खासदारांनी दै. भास्करला सांगितले बैठक व्यवस्था असूनही कोणताही खासदार अधिकार वापरून मुख्य चेंबरमध्ये जाऊ शकतो. गॅलरीतून उतरून एका मिनिटात पायऱ्या उतरून मुख्य सभागृहात येऊन कर्तव्य पार पाडू शकतो.

> सभागृहातील कर्मचाऱ्यांची संख्याही मर्यादित असेल.

> एका वेळी १५ कर्मचारी बसू शकतील.

> राज्यसभा व लोकसभा टीव्हीच्या प्रसारण चेंबरमध्ये वेगळे पडदे बसवले आहेत. कागदाचा कमीत कमी वापर करण्यास सांगण्यात आले आहे. दोन्ही चेंबर व गॅलरीदरम्यान संसर्ग पसरू नये म्हणून पॉलिकॉर्बोनेट सेपरेशन स्क्रीन बसवण्यात आली आहे.

> हवेतून संसर्ग रोखण्यासाठी वातानुकूलन यंत्रणेत अतिनील किरणांद्वारे संसर्ग रोखण्यासाठीची व्यवस्था केली आहे.

> दोन्ही सभागृहांना जोडण्यासाठी ८५ इंचांचे मोठे स्क्रीन बसवले आहेत. ४ गॅलरीत ४०-४० इंचांचे चार मोठे डिस्प्ले स्क्रीन बसवण्यात येत आहेत.

> दोन्ही सभागृहांत ऑडिओ-व्हिज्युअल व्यवस्थेसाठी वायर्सचे जाळे टाकण्यात येत आहे.

> गॅलरीत बसलेल्या खासदारांसाठी प्लेकार्ड व पडद्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

> दहा दिवस चालू शकते अधिवेशन

> कोरोना संसर्गामुळे पावसाळी अधिवेशन सुरू करण्यास उशीर झाला आहे. नियमाप्रमाणे दर सहा महिन्यांनी सभागृहाचे कामकाज होणे आवश्यक आहे. याचा कालावधी सप्टेंबर महिन्यात संपतो आहे. यामुळे सप्टेंबर महिन्यात पहिल्या आठवड्यापासून तिसऱ्या आठवड्याच्या दरम्यान अधिवेशन बाेलावणे आवश्यक आहे.

> सचिवालयांना ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत अधिवेशनाची तयारी पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सत्र दहा दिवस चालेल असा अंदाज आहे. ज्ञात असेल की, कोरोनामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन वेळेपूर्वीच म्हणजे २३ मार्च रोजी स्थगित केले

बातम्या आणखी आहेत...