आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहवाई दलाने ग्रुप कॅप्टन शलिजा धामी यांना पाकिस्तान सीमेवर तैनात लढाऊ युनिटचे नेतृत्व सोपवले आहे. १९३२ मध्ये स्थापन भारतीय हवाई दलाच्या ९० वर्षांच्या इतिहासात प्रथमच एखादी महिला कॉम्बॅट युनिटची कमांडर बनली आहे. धामी २००३ मध्ये हवाई दलात हेलिकॉप्टर पायलट म्हणून रुजू झाल्या. २,८०० तासांचा उड्डाणाचा अनुभव असलेल्या धामी कॉम्बॅट युनिटच्या सेकंड इन कमांड होत्या. धामी या फ्लाइंग ब्रँचमध्ये परमनंट कमिशन प्राप्त करणाऱ्या देशातील पहिल्या महिला अधिकारी आहेत. आता त्या कमांडर म्हणून मिसाइल लढाऊ युनिट सांभाळणार आहेत. हे युनिट पंजाबमध्ये तैनात आहे. महिला कमांडरला इतकी मोठी जबाबदारी सोपवण्याचा भारतीय हवाई दलाचा हा निर्णय मैलाचा दगड ठरेल, असे लष्करी इतिहासकारांचे म्हणणे आहे.
शहीद करतार सिंह सराभा यांच्या गावात वाढल्या
ग्रुप कॅप्टन धामी या पंजाबच्या लुधियाना जिल्ह्यातील सराभा गावात वाढल्या आहेत. याच गावात शहीद करतार सिंह सराभा यांचा जन्म झाला होता. ब्रिटिश राजवटीच्या विरोधात क्रांतिकारी चळवळीमुळे त्यांना वयाच्या १९ व्या वर्षी फाशी देण्यात आली. या गावात त्यांच्या कथा सर्व मुलांना ऐकवल्या जातात. धामी यांनी येथेच सरकारी शाळेत शिक्षण घेतले. महाविद्यालयात एनसीसीच्या एअर विंगमध्ये त्या सक्रिय होत्या. बी.एस्सी. व्हायच्या आधीच त्यांची हवाई दलात निवड झाली. बी.एस्सी. झाल्यानंतर त्यांना नेमणूक मिळाली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.